Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 1:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 त्या वेळी मी तुमच्या न्यायाधीशांना आज्ञा केली की, ‘तुम्ही आपापल्या भाऊबंदांचे वाद ऐका; एखादा माणूस व त्याचा भाऊबंद व त्याच्याजवळचा उपरा ह्यांच्यामध्ये नीतीने न्याय करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की तुमच्या भाऊबंदांतील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करू नका मग तो वाद दोन भावांमधला असो की एखादा मनुष्य व त्याचा भाऊबंद व उपरी यांच्यातील असो. नीतिने न्याय करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 आणि त्यावेळी मी तुमच्या न्यायाधीशांना आज्ञा केली, “तुमच्या लोकांचा वाद ऐकून त्यावर न्याय करावा, मग तो दोन इस्राएली लोकांमधील असो किंवा इस्राएली आणि तुमच्यामध्ये राहणारे परदेशी यांच्यातील असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 1:16
22 Iomraidhean Croise  

ह्या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो. ज्यामुळे नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?”


इस्राएलाचा देव म्हणाला, इस्राएलाचा दुर्ग मला म्हणाला, मानवांवर न्यायाने राज्य करणारा, देवाचे भय धरून त्यांच्यावर राज्य करणारा निर्माण होईल.


अहो सत्ताधीशांनो, तुम्ही यथार्थ न्याय करता काय? तुम्ही मनुष्यामनुष्यामध्ये चोख निवाडा करता काय?


उपर्‍याला छळू नकोस किंवा त्याच्यावर जुलूम करू नकोस, कारण मिसर देशात तुम्हीही उपरे होता.


आपले मुख उघड, नीतिमत्त्वाने न्याय कर; गरीब व कंगाल ह्यांना न्याय मिळू दे.


न्यायनिवाडा करताना अन्याय करू नकोस, गरिबाच्या गरिबीकडे पाहू नकोस आणि समर्थापुढे नमू नकोस; तर आपल्या शेजार्‍याचा न्याय निःस्पृहपणे कर.


तुम्ही परदेशीय असा किंवा स्वदेशीय असा, तुम्हा सर्वांना एकच नियम असावा, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.”


एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर त्याला उभे करून त्यांच्यादेखत त्याला अधिकारारूढ कर.


वरवर पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”


म्हणून तुमच्या वंशांपैकी बुद्धिमान व अनुभवी अशा मुख्य पुरुषांना मी तुमचे प्रमुख नेमले, म्हणजे तुमच्या वंशावंशांप्रमाणे हजारा-हजारांवर, शंभरा-शंभरांवर, पन्नासा-पन्नासांवर व दहा-दहांवर नायक व अंमलदार नेमून दिले.


तुझ्या बांधवांपैकी अथवा देशातील तुझ्या गावात राहणार्‍या उपर्‍यांपैकी एखादा मजूर दीन व कंगाल असला तर त्याच्यावर जुलूम करू नकोस,


लोकांमध्ये काही वाद उपस्थित झाला आणि ते न्याय मागण्यासाठी आले तर न्यायाधीशांनी त्यांचा निवाडा करावा; निर्दोष्याला निर्दोषी ठरवावे आणि दोष्याला दोषी ठरवावे.


मग त्याच दिवशी मोशेने लोकांना आज्ञा केली की,


परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, तुझा अंतकाळ समीप आला आहे म्हणून यहोशवाला बोलाव आणि तुम्ही दोघे दर्शनमंडपात उपस्थित व्हा म्हणजे मी त्याला अधिकारसूत्रे देईन.” मग मोशे व यहोशवा दर्शनमंडपात उपस्थित झाले.


तुम्हांला ठाऊकच आहे की, बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला बोध करत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो की,


देव, प्रभू येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत ह्यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की, मनात अढी न धरता ह्या आज्ञा पाळ, पक्षपाताने काही करू नकोस.


प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणांस उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan