Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यार्देनेच्या पूर्वेस रानातील अराबात सूफासमोर पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दी-जाहाब ह्यांच्या दरम्यान जी वचने मोशे सर्व इस्राएलांशी बोलला ती ही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यार्देन नदीच्या पूर्वेकडील रानात अराबामध्ये सुफासमोर, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दि-जाहाब यांच्या दरम्यान मोशे सर्व इस्राएलाशी वचने बोलला ती ही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 इस्राएली लोक यार्देन नदीच्या पूर्वेस असणार्‍या रानातील अराबा नावाच्या दरीमध्ये तळ देऊन राहिले होते, त्यावेळी मोशे जे बोलला त्या सर्व गोष्टीची नोंद या पुस्तकात केलेली आहे. या प्रदेशात सूफ, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दीजाहाब इत्यादी शहरांचा समावेश होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 1:1
29 Iomraidhean Croise  

तो पारानाच्या रानात वस्ती करून राहिला, आणि त्याच्या आईने त्याला मिसर देशातली बायको करून दिली.


ते मिद्यानातून जाऊन पारानास आले आणि पारानातून काही लोक बरोबर घेऊन मिसर देशाला फारो राजाकडे गेले; फारोने त्यांना राहायला घर दिले, त्यांच्या खाण्यापिण्याची तरतूद केली व त्यांना काही जमीनही दिली.


देव तेमानाहून येत आहे, पवित्र प्रभू पारानाच्या पर्वतावरून येत आहे.(सेला) त्याचा प्रकाश आकाश व्यापतो; त्याच्या स्तवनांनी पृथ्वी भरली आहे.


तेव्हा इस्राएल लोकांनी सीनाय रानातून आपापल्या टप्प्याप्रमाणे कूच केले; नंतर मेघ पारानाच्या रानात स्थिर झाला.


किब्रोथ-हत्तव्वा येथून कूच करून ते हसेरोथ येथे पोहचले; आणि हसेरोथ येथे ते राहिले.


ह्यानंतर हसेरोथ येथून कूच करून त्यांनी पारानाच्या रानात डेरे दिले.


ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे, अहरोन व इस्राएलाची सर्व मंडळी ह्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकिकत सांगितली आणि त्या देशाची फळे दाखवली.


परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने पारान रानातून त्यांना पाठवले; ते सगळे पुरुष इस्राएल लोकांचे प्रमुख होते.


आम्ही त्यांच्याबरोबर यार्देनेच्या पैलतीरी किंवा त्यांच्याही पलीकडे वतन घेणार नाही; कारण यार्देनेच्या अलीकडे उगवतीस आमचा हिस्सा आम्हांला मिळाला आहे.”


आम्ही स्वतः सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे पलीकडे कनान देशात जाऊ, पण आमचे वतन यार्देनेच्या पूर्वेसच असावे.”


ते पुढे म्हणाले, “तुझी कृपादृष्टी आमच्यावर असली तर हा प्रदेश तुझ्या दासांना वतन करून दे; आम्हांला यार्देनेपलीकडे नेऊ नकोस.”


रिम्मोन-पेरेस येथून कूच करून त्यांनी लिब्ना येथे तळ दिला.


लिब्ना येथून कूच करून त्यांनी रिस्सा येथे तळ दिला.


ह्याप्रमाणे यरीहोसमोर यार्देनेच्या अलीकडे पूर्व दिशेस म्हणजे उगवतीस अडीच वंशांना त्यांचे वतन मिळाले आहे.”


तीन नगरे यार्देनेच्या पूर्वेस द्यावीत आणि तीन नगरे कनान देशात द्यावीत, ही शरणपुरे होत.


म्हणून सेईरचे रहिवासी आपले भाऊबंद जे एसावाचे वंशज ह्यांना चुकवून आपण अराबाच्या मार्गाने एलाथ व एसयोन-गेबर ही मागे टाकून पुढे गेलो. मग आपण वळून मवाबातील रानाकडल्या मार्गाने गेलो.


मग मोशे व इस्राएलाचे वडील जन ह्यांनी लोकांना आज्ञा केली की, “जी आज्ञा मी आज तुम्हांला देत आहे ती सर्व पाळा.


जो करार होरेबात परमेश्वराने इस्राएल लोकांशी केला होता त्याखेरीज जो करार मवाब देशात त्याने त्यांच्याशी करण्याची मोशेला आज्ञा दिली होती त्या कराराची वचने ही.


मोशेने जाऊन सर्व इस्राएलांना ही वचने सांगितली.


तो म्हणाला, “परमेश्वर सीनायहून आला, सेईरावरून आमच्यावर1 उदय पावला; पारान पर्वतावरून तो प्रकटला, लक्षावधी पवित्रांच्या मधून तो आला, त्याच्या उजव्या हातापासून अग्निज्वाला निघाली.


मिसर देशातून बाहेर आल्यावर मोशे आणि इस्राएल लोकांनी जो हेशबोननिवासी अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याला पराजित केले, त्याच्या देशात यार्देनेच्या पूर्वेस बेथपौराच्या समोरील खोर्‍यात हे सांगण्यात आले;


मोशेने सर्व इस्राएल लोकांना बोलावून सांगितले : “अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम आज मी तुम्हांला ऐकवत आहे ते ऐका; तुम्ही ते शिका आणि काळजीपूर्वक पाळा.


आता तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या वचनानुसार तुमच्या भाऊबंदांना विसावा दिला आहे, तर परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देनेपलीकडे तुम्हांला जो देश तुमच्या ताब्यात दिला आहे तेथे तुम्ही आता आपापल्या डेर्‍यांकडे परत जा.


मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशानात वतन दिले होते, पण त्यांच्या दुसर्‍या अर्ध्या वंशाला यहोशवाने यार्देनेच्या पश्‍चिमेस त्यांच्या भाऊबंदांमध्ये वतन दिले होते. यहोशवाने त्यांना आपापल्या डेर्‍यांकडे रवाना केले तेव्हा त्यांना आशीर्वाद देऊन तो म्हणाला,


तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बर्‍याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगराजवळ साठून चढले व त्याची रास झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले; मग ते लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.


हे ऐकून यार्देनेच्या पश्‍चिमेकडे डोंगरवटीत, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या सबंध किनार्‍यावरील हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्यांचे सर्व राजे


आणि यार्देनेच्या पलीकडील अमोर्‍यांचे दोन राजे, हेशबोनाचा राजा सीहोन आणि अष्टारोथनिवासी बाशानाचा राजा ओग, ह्या दोघांचे त्याने काय केले हेही आम्ही जाणून आहोत.


पुढे शमुवेल मृत्यू पावला; तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून शोक केला आणि रामा येथील त्याच्या घरात त्याला मूठमाती दिली. इकडे दावीद निघून पारान नावाच्या अरण्यात गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan