दानीएल 9:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हे प्रभो, न्यायत्व काय ते तुझ्याच ठायी आहे; परंतु आमच्या तोंडाला आजच्याप्रमाणे काळोखी लागली आहे; यहूदाचे लोक, यरुशलेमनिवासी लोक आणि जवळ व दूर राहणारे सर्व इस्राएल लोक ह्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे तू त्यांना निरनिराळ्या देशात हाकून लावलेस, त्या सगळ्यांच्या तोंडांना काळोखी लागली आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आमच्या देवा, हे परमेश्वरा धार्मिकता, न्यायत्व तुझे आहे तथापि आज आमची तोंडे लज्जीत झाली आहेत. यहूदाचे यरूशलेमेत राहणारे सर्व इस्राएलाचे सर्व निवासी त्यामध्ये आहेत, त्यांनी तुझ्या विरूद्ध केलेल्या अपराधामुळे, त्यांना तू सर्व देशात विखुरले होते कारण आम्ही तुझ्या विरोधात पाप केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “हे प्रभू, तुम्ही नीतिमान आहात, परंतु आज आम्ही लज्जित झालो आहोत; यहूदीयात राहणारे, यरुशलेमात राहणारे, जवळ व दूर राहणारे सर्व इस्राएली लोक आणि ज्यांना तुमच्याविरुद्ध केलेल्या अविश्वासाच्या कृत्यांमुळे सर्व देशांमध्ये तुम्ही घालवून दिले. Faic an caibideil |