दानीएल 9:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त,1 अधिपती असा जो तो येईपर्यंत सात सप्तकांचा अवकाश आहे व बासष्ट सप्तके लोटल्यावर1 धामधुमीचा काळ असताही नगर, रस्ते व खंदक ह्यांसह बांधतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 हे जाण आणि समजून घे की, यरूशलेमेची पुनर्बांधणी करण्याची आज्ञा झाल्यापासून तर अभिषिक्त पुढारी येईपर्यंतचा अवकाश सात सप्तके आणि बासष्ट आठवडे आहे. त्यानंतर यरूशमेलेची पुनर्बांधणी होईल; आणि संकटाच्या काळातही खंदक आणि कोट यांसह ती बांधण्यात येईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 “हे जाणा आणि समजून घ्या: यरुशलेमची पुनर्स्थापना आणि पुनर्बांधणी करण्यासाठी सात ‘सप्तके’ आणि बासष्ट ‘सप्तके’ निश्चित केली आहेत. ते शब्द बाहेर येण्यापासून तो अभिषिक्त शासनकर्ता होईपर्यंतचा वेळ ठरविला आहे. अडचणीच्या वेळी रस्त्यावर आणि खंदकाने पुन्हा बांधले जाईल, Faic an caibideil |