Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 9:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तुझ्या प्रार्थनांना आरंभ होताच आज्ञा झाली, ती तुला सांगण्यास मी आलो आहे; कारण तू परमप्रिय आहेस; तर ह्या गोष्टींचा विचार कर व हा दृष्टान्त समजून घे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तुझ्या विनंत्यांच्या आरंभी वचन निघाले, आणि ते प्रगट करायला मी आलो आहे, कारण तू फारच प्रिय आहेस; म्हणून या गोष्टीचा विचार कर आणि दृष्टांत समजून घे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 ज्या क्षणाला तू प्रार्थना करण्यास सुरुवात केलीस, त्याच क्षणाला एक आज्ञा देण्यात आली, ती काय आहे हे तुला सांगण्यासाठीच मी आलो आहे. कारण तू अतिशय प्रिय आहेस. म्हणून या गोष्टींचा विचार कर आणि दृष्टान्त नीट समजून घे:

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 9:23
12 Iomraidhean Croise  

तेव्हा आमोजाचा पुत्र यशया ह्याने हिज्कीयाला सांगून पाठवले की, “परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो, अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याच्याविषयी तू माझी प्रार्थना केलीस ती मी ऐकली आहे.


दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते.


मी आपल्या वल्लभाची आहे; त्याचे मन माझ्यावर बसले आहे.


तेव्हा त्यात नोहा, दानीएल व ईयोब हे तिघे असले तरी फार झाले; ते आपल्या नीतिमत्तेमुळे आपला तेवढा जीव वाचवतील असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


“मानवपुत्रा, पाहा, मी तुझ्या नेत्रांना जे प्रिय ते सपाट्यासरशी तुझ्यापासून काढून घेतो; तरी तू शोक करणार नाहीस, रडणार नाहीस, अश्रू गाळणार नाहीस.


ते तुझी संपत्ती लुटतील, तुझा माल लुटतील; तुझे तट उद्ध्वस्त करतील, तुझे रंगमहाल पाडून टाकतील; तुझे पाषाण, लाकूड, माती वगैरे सर्वकाही पाण्यात बुडवून टाकतील.


पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बेल्टशस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास एक गोष्ट प्रकट झाली; ती गोष्ट सत्य असून मोठ्या युद्धाविषयीची होती; त्याला ती गोष्ट समजली; त्या दृष्टान्ताचे मर्म त्याला कळले.


तो म्हणाला, “परमप्रिय मानवा, भिऊ नकोस; तुला शांती असो, हिंमत धर, नेट धर.” तो माझ्याबरोबर बोलला तेव्हा मला शक्ती आली व मी म्हणालो, “माझ्या स्वामी, तू आता बोलावे, कारण तू माझ्यात हिंमत आणली आहेस.”


दानीएल त्या अध्यक्षांत व प्रांताधिकार्‍यांत श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्या ठायी उत्तम आत्मा वसत होता; त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता.


दानिएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात’ उभा असलेला तुम्ही पाहाल, (वाचकाने हे ध्यानात आणावे),


देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, “हे कृपा पावलेल्या स्त्रीये, कल्याण असो; प्रभू तुझ्याबरोबर असो.”1


Lean sinn:

Sanasan


Sanasan