Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 9:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 मी बोलत व प्रार्थना करीत असता, माझे पाप व माझे लोक इस्राएल ह्यांचे पाप कबूल करीत असता आणि माझ्या देवाच्या पवित्र पर्वतासाठी माझा देव परमेश्वर ह्याच्याकडे विनवणी करीत असता,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 आणि मी बोलत व प्रार्थना करीत असता आणि आपले पाप व आपले लोक इस्राएल यांचे पाप कबूल करीत असता, आणि आपल्या देवाच्या पवित्र पर्वताकरिता परमेश्वर माझा देव याच्यापुढे माझी विनंती सादर करीत होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 जेव्हा मी माझे पाप आणि आपल्या इस्राएली लोकांचे पाप कबूल करीत बोलत आणि प्रार्थना करीत होतो आणि याहवेह माझ्या परमेश्वर यांची त्यांच्या पवित्र डोंगरासाठी प्रार्थना करीत होतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 9:20
24 Iomraidhean Croise  

जे कोणी त्याचा धावा करतात, जे खर्‍या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.


कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत;


तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल; तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील;


हे प्रभो, आपल्या सर्व न्यायकृत्यांप्रमाणे यरुशलेम नगरीवरील, तुझ्या पवित्र पर्वतावरील, आपला क्रोध व संताप दूर कर; आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मांमुळे यरुशलेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांना निंदेचे विषय झाले आहेत.


त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन, ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन, असे होईल.


तेव्हा मी म्हणालो, “हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले!”


मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीती लपवून ठेवली नाही; “मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन” असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केलीस. (सेला)


तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने ‘मला’ मोठ्या ‘उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम’ देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली.


तेव्हा मी ‘पवित्र नगरी, नवी यरुशलेम’, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवर्‍यासाठी ‘शृंगारलेल्या नवरीप्रमाणे’ सजवलेली होती.


कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे.


त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.


परमेश्वर असे म्हणतो, मी सीयोनेस परत आलो आहे, मी यरुशलेमेत वस्ती करणार; यरुशलेमेस ‘सत्यनगर’ म्हणतील व सेनाधीश परमेश्वराच्या पर्वतास ‘पवित्र गिरी’ म्हणतील.


त्या दिवसांत मी दानीएल सबंध तीन सप्तके शोक करीत होतो.


त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थनामंदिरात त्यांना हर्षित करीन; माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील; कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनामंदिर आहे असे म्हणतील.


सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा नीतिमान पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.


एज्रा देवाच्या मंदिरापुढे पडून रडत असता व प्रार्थना करून पापांगीकार करत असता इस्राएल स्त्रीपुरुष व मुलेबाळे ह्यांचा मोठा समुदाय त्याच्याजवळ जमा झाला; लोक धायधाय रडत होते.


तुझे सेवक इस्राएल लोक ह्यांच्यासाठी मी तुझा दास ह्या वेळी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे; ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पाहा; आम्ही इस्राएल लोकांनी तुझ्याविरुद्ध पातके केली आहेत, ती मी कबूल करतो; मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे.


तो मला म्हणाला, “दानिएला, भिऊ नकोस; कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा, व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्‍चय केलास त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले; त्या तुझ्या शब्दांवरून मी आलो आहे.


समुद्राच्या व शोभिवंत पवित्र पर्वतांच्या दरम्यान तो आपले दरबारी तंबू ठोकील; पण त्याचा अंत येईल, कोणी त्याला साहाय्य करणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan