Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 9:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आता हे प्रभो, आमच्या देवा, तू आपल्या सामर्थ्यवान हाताने मिसर देशातून आपल्या लोकांना बाहेर आणले व आजच्याप्रमाणे आपला महिमा वाढवला. आम्ही पाप केले आहे; आम्ही दुराचरण केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 प्रभू आमच्या देवा, तू आपले लोक मिसर देशातून प्रतापी हाताने बाहेर आणले, आणि आज आहे त्याप्रमाणे आपणाला किर्ती प्राप्त करून घेतली आहे; आम्ही पाप केले आहे, आम्ही दुष्टाईने वागलो आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 “आणि आता याहवेह आमच्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या महान हातांनी तुमच्या लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले आणि आपल्या नावाची महिमा प्रस्थापित केली, जी आजपर्यंत आहे. आम्ही पाप केले आणि आम्ही चूक केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 9:15
30 Iomraidhean Croise  

कारण, ज्यांना तू मिसर देशातून, लोखंडाच्या भट्टीतून काढले तेच हे तुझे लोक, तुझे वतन होत;


कारण त्यांचे पूर्वज मिसर देशातून बाहेर निघाले तेव्हापासून आजपर्यंत माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्यांनी मला संताप आणला आहे.”


तर ज्या देशात त्यांना पाडाव करून नेले असेल तेथे ते विचार करतील आणि आपल्याला पाडाव करून नेणार्‍या लोकांच्या देशात तुझ्याकडे वळून तुझी विनवणी करून म्हणतील, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही कुटिलतेने वागलो आहोत, आम्ही दुराचरण केले आहे’;


पाहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत, त्यांना तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबल हस्ताने सोडवले आहेस.


तुझे सेवक इस्राएल लोक ह्यांच्यासाठी मी तुझा दास ह्या वेळी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे; ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पाहा; आम्ही इस्राएल लोकांनी तुझ्याविरुद्ध पातके केली आहेत, ती मी कबूल करतो; मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे.


फारो, त्याचे सेवक, त्याच्या देशाचे सर्व लोक ह्यांना चिन्हे व अद्भुत कृत्ये तू दाखवलीस; कारण ते त्यांच्याशी गर्वाने वागत होते हे तुला ठाऊक होते; तू आपल्या नामाचा महिमा प्रकट केला; तो आजवर आहे.


तरी आपला पराक्रम विदित करावा म्हणून, त्याने आपल्या नावासाठी त्यांचे तारण केले.


पुढील काळी तुझा मुलगा तुला विचारील की हे काय आहे? तेव्हा त्याला सांग, ‘मिसर देशातून, दास्यगृहातून परमेश्वराने आम्हांला आपल्या भुजबलाने बाहेर आणले,


हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान कपाळपट्टी असे असावे; कारण परमेश्वराने आपल्या बलवान हाताने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले.”


मोशे लोकांना म्हणाला, “ह्या दिवसाची आठवण ठेवा; ह्याच दिवशी तुम्ही मिसरातून, दास्यगृहातून बाहेर निघालात; परमेश्वराने आपल्या बलवान हाताने तुम्हांला ह्या ठिकाणातून बाहेर आणले म्हणून ह्या दिवशी खमिराची भाकर खायची नाही.


हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान स्मारक असे असावे; परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा; कारण परमेश्वराने भुजबलाने तुला मिसर देशातून बाहेर आणले;


फारो, त्याचे रथ व त्याचे स्वार ह्यांच्या (पराभवा) कडून माझे गौरव झाल्याने मी परमेश्वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.”


तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर ह्याची काकळूत करून म्हणाला, “हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिसर देशातून बाहेर आणलेस, त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा?


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोला काय करतो ते तू पाहशील. मी त्याला भुजप्रताप दाखवला म्हणजे तो ह्या लोकांना जाऊ देईल; मी त्याला भुजप्रताप दाखवला म्हणजे तो ह्यांना आपल्या देशातून बाहेर घालवून देईल.” मोशेला दुसर्‍यांदा झालेले पाचारण


म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन;


तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रकट व्हावे ह्यासाठीच मी तुला राखले आहे.


काटेर्‍याच्या जागी सरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल; ह्यावरून परमेश्वराचे नाव होईल; ते सर्वकाळचे चिन्ह होईल, ते कधी नष्ट होणार नाही.”


हे देवा, तुझी आशा धरून राहणार्‍यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाही, त्याचे नाव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही.


हे परमेश्वरा, आमची दुष्टता, आमच्या पूर्वजांचे दुष्कर्म, आम्ही जाणतो; आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.


मी खरेदीखतावर सही केली, त्यावर शिक्का मारला व साक्षी बोलावून त्याला पैसा तागडीने तोलून दिला.


“आम्ही अपराध केला व फितुरी केली; त्याची तू क्षमा केली नाहीस.


तरी तिने दुष्ट आचरण करून माझ्या निर्णयांना इतर राष्ट्रांपेक्षाही अधिक विरोध केला, तिने सभोवतालच्या प्रदेशांपेक्षाही माझ्या नियमांचा अधिक विरोध केला; कारण त्यांनी माझ्या निर्णयांचा अव्हेर केला व माझ्या नियमाप्रमाणे ते चालले नाहीत.


आम्ही पाप केले, कुटिलतेने वागलो, दुष्टतेचे वर्तन केले; फितुरी झालो, तुझे विधी व तुझे निर्णय ह्यांपासून आम्ही परावृत्त झालो.


मुलगा त्याला म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे; आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही.’


जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यासदेखील न धजता आपला ऊर बडवत म्हणाला, ‘हे देवा, मज पाप्यावर दया कर.’


त्याने आम्हांला एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हांला ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.


तू मिसर देशात दास होतास आणि तेथून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला पराक्रमी बाहूंनी व उगारलेल्या हाताने बाहेर आणले ह्याची आठवण ठेव; म्हणूनच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला शब्बाथ दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan