Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तो बकरा अतिप्रबल झाला; तो बलिष्ठ झाला असता त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्याच्याऐवजी त्याला चार बाजूंना चार ठळक शिंगे फुटली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग तो बकरा मोठा झाला पण तो जेव्हा प्रबळ झाला, तेव्हा त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्याच्या जागेवर चार नवीन शिंगे फुटली ती चारही बाजूस ठळक होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तो बोकड फार महान झाला, परंतु तो बलिष्ठ झाल्यामुळे त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्या शिंगाच्या जागी चार ठळक शिंगे फुटली. त्यांची टोके चारही दिशांनी वाढली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 8:8
19 Iomraidhean Croise  

तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला, आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले; धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.


मर्दखयाचा राजदरबारी मोठा मान असून त्याची कीर्ती सर्व प्रांतांतून पसरली होती; मर्दखयाचा महिमा उत्तरोत्तर वाढत गेला.


एलामावर आकाशाच्या चारही भागांतून मी चार वारे सोडीन व त्यांना त्या चारही दिशांना विखरीन; ज्यात एलामाचे पांगलेले लोक गेले नाहीत असे एकही राष्ट्र सापडायचे नाही.


पिंजरा पक्ष्यांनी भरलेला असतो तशी त्यांची घरे कपटाच्या प्राप्तीने भरलेली असतात; म्हणून ते थोर व श्रीमंत झाले आहेत.


शेतातले बीज वाढून सहस्रपट होते तशी मी तुझी वृद्धी केली; तू वाढून उंच झालीस, तू अति सुंदर झालीस, तुला ऊर फुटले, तुझे केस वाढले तरी तू उघडीनागडी होतीस.


तू आपल्या वधणार्‍यासमोर ‘मी देव आहे,’ असे म्हणशील काय? घायाळ करणार्‍याच्या हाती सापडलास तो तू देव नव्हेस, मानव आहेस.


तो उदयास आला न आला तोच त्याचे राज्य मोडून चार दिशांना त्याचे विभाग होतील; तरी त्याच्या संततीच्या वाट्यास काहीएक येणार नाही, व त्या राज्याचा विस्तार पूर्वीप्रमाणे राहणार नाही; कारण त्याच्या राज्याचे उच्चाटन करून ते त्याच्या संततीस वगळून इतरांना देण्यात येईल.


हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली की, “हे राजा, नबुखद्नेस्सरा, हे तुला विदित होवो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे.


पुढे त्याच्या हृदयात ताठा शिरला, व त्याचा आत्मा कठोर होऊन उन्मत्त झाला तेव्हा त्याला त्याच्या राजपदावरून काढण्यात आले व त्याचे वैभव हिरावून घेण्यात आले.


दानिएलाने म्हटले, “मी रात्री दृष्टान्तात पाहिले तर चार्‍ही दिशांचे वारे महासागरावर सुटले;


ह्यानंतर मी पाहिले तर आणखी एक श्वापद चित्त्यासारखे दिसले; त्याच्या पाठीवर पक्ष्याचे चार पंख होते; त्या श्वापदाला चार शिरेही होती; त्याला अधिकार दिला होता.


एक शिंग मोडून त्याच्या जागी चार शिंगे निघाली ह्याचा अर्थ असा की त्या राज्यातून चार राज्ये उद्भवतील; मग त्यांचे बल पहिल्या राज्याइतके राहायचे नाही.


मी विचार करीत होतो तेव्हा पाहा, पश्‍चिम दिशेकडून एक बकरा सर्व पृथ्वी आक्रमून आला; येताना त्याने जमिनीस पाय लावला नाही; त्या बकर्‍याच्या डोळ्यांच्या मधोमध एक ठळक शिंग होते.


मी पाहिले तेव्हा तो त्या एडक्याजवळ गेला, व त्याने क्रोधाने खवळून त्या एडक्यास धडक मारली व त्याची दोन्ही शिंगे मोडून टाकली; त्याच्यापुढे टिकाव धरण्याची त्या एडक्यास शक्ती नव्हती; त्या बकर्‍याने त्याला जमिनीवर पाडून तुडवले; त्या एडक्याला त्याच्या हातातून सोडवण्याचे कोणाला सामर्थ्य नव्हते.


‘कर्ण्याच्या महानादाबरोबर’ तो आपल्या दूतांना पाठवील, आणि ‘ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्‍या सीमेपर्यंत’ त्याच्या निवडलेल्यांना ‘चार्‍ही दिशांकडून जमा करतील.’


त्या वेळेस तो देवदूतांना पाठवून ‘चार दिशांकडून, अर्थात पृथ्वीच्या’ सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत ‘आपल्या निवडलेल्या लोकांना’ एकत्र करील.


कारण ज्या देशात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश देण्याची शपथ मी त्यांच्या पूर्वजांशी वाहिली होती, त्यात मी त्यांना नेऊन पोहचवल्यावर ते पोटभर खाऊन माजतील, आणि मग अन्य देवांकडे वळून त्यांची सेवा करतील आणि मला तुच्छ लेखून माझा करार मोडतील.


ह्यानंतर मी चार देवदूत ‘पृथ्वीच्या चार कोनांवर’ उभे राहिलेले पाहिले, ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे ‘चार वारे’ अडवून धरत होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan