Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मी पाहिले तेव्हा तो त्या एडक्याजवळ गेला, व त्याने क्रोधाने खवळून त्या एडक्यास धडक मारली व त्याची दोन्ही शिंगे मोडून टाकली; त्याच्यापुढे टिकाव धरण्याची त्या एडक्यास शक्ती नव्हती; त्या बकर्‍याने त्याला जमिनीवर पाडून तुडवले; त्या एडक्याला त्याच्या हातातून सोडवण्याचे कोणाला सामर्थ्य नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मी पाहिले तो बकरा त्या एडक्याजवळ आला तो एडक्यावर रागे भरुन होता आणि त्याने एडक्यास धडक दिली आणि त्याची दोन शिंगे तोडून टाकली. एडका त्याच्यासमोर उभा राहण्यास शक्तीहिन होता. बकऱ्याने त्यास जमिनीवर पाडून तुडवून टाकले त्याच्या हातून त्या एडक्यास सोडविण्याचे कोणालाही सामर्थ्य नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मी पाहिले की त्याने फार क्रोधित होऊन मेंढ्यावर हल्ला केला आणि धडक देत त्याचा दोन्ही शिंगांना मोडून टाकले. मेंढा त्याच्या विरोधात उभा राहण्यास शक्तिहीन होता; बोकडाने त्याला जमिनीवर आपटले आणि पायाखाली तुडविले आणि त्याच्या शक्तीपासून मेंढ्याला कोणालाही सोडविता आले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 8:7
8 Iomraidhean Croise  

तेव्हा दक्षिणेच्या राजाचे पित्त खवळून तो बाहेर पडून उत्तरेच्या राजाबरोबर युद्ध करील; तो पुष्कळ लोकसमूह घेऊन निघेल, पण तो समूह त्याच्या हाती लागेल.


इतर श्वापदांविषयी म्हणाल तर त्यांचा अधिकार हरण करण्यात आला; तरी काही मुदतीपर्यंत काही काळपावेतो त्यांचा प्राण वाचवण्यात आला.


ह्यानंतर मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तो पाहा, एक चौथे श्वापद विक्राळ, भयानक व अतिशय बळकट असे होते; त्याला मोठाले लोखंडी दात होते; ते सर्वकाही चावून त्याचा चुरा करी व उरलेले आपल्या पायांखाली तुडवी; ते अगोदरच्या सर्व श्वापदांहून भिन्न होते; आणि त्याला दहा शिंगे होती.


त्याची वृद्धी आकाशगणांपर्यंत होऊन त्या गणांपैकी व त्या तार्‍यांपैकी काहींना त्याने जमिनीवर पाडून तुडवले.


मी जो दोन शिंगांचा एडका नदीसमोर उभा राहिलेला पाहिला होता त्याच्याकडे तो बकरा गेला; त्याने आपले सर्व बळ खर्चून त्वेषाने त्याला धडक मारली.


तो बकरा अतिप्रबल झाला; तो बलिष्ठ झाला असता त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्याच्याऐवजी त्याला चार बाजूंना चार ठळक शिंगे फुटली.


कोणी पाठीस लागले नसताही ते तलवारच पाठीस लागल्यासारखे अडखळून एकमेकांवर पडतील; तुमच्या शत्रूंशी सामना करण्यासाठी तुमच्यात त्राण उरणार नाही.


आय नगराच्या पुरुषांनी मागे वळून पाहिले तो नगराचा धूर आकाशात चढताना त्यांना दिसला, तेव्हा त्यांना इकडे किंवा तिकडे पळण्याची ताकद राहिली नाही; इकडे जे लोक रानाच्या मार्गाने पळत होते ते आपला पाठलाग करणार्‍यांवर उलटले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan