Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 8:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तो एडका पश्‍चिमेस, उत्तरेस व दक्षिणेस धडका मारीत आहे असे मी पाहिले; कोणी पशू त्याच्यासमोर उभा राहीना, व त्याच्या तडाक्यातून एखाद्यास सोडवायचे कोणास सामर्थ्य नव्हते; तो आपल्या मनास येई तसे करी, असा तो प्रबल झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मी पाहिले तो एक एडका पश्चिमेस नंतर उत्तरेस आणि नंतर दक्षिणेस धडक मारत होता, कोणी पशू त्यासमोर उभा राहू शकला नाही. त्याच्या तावडीतून कोणी सोडवण्यास सबळ नव्हता त्यास जे पाहिजे ते तो करी आणि तो महान झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मी पाहिले की तो मेंढा पश्चिमेकडे, उत्तरेकडे, आणि दक्षिणेकडे धडक मारीत होता. दुसर्‍या कोणताही प्राणी त्याच्यासमोर उभा राहू शकला नाही आणि त्याच्या सामर्थ्यापासून वाचू शकला नाही. त्याला ज्यात संतोष वाटला, ते त्याने केले आणि तो महान झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 8:4
18 Iomraidhean Croise  

तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया ह्याने लोखंडाची शिंगे करून आणली होती; तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ह्या शिंगांनी तू अरामी लोकांना हुंदडून त्यांचा नाश करशील.”


तुला तर ठाऊक आहेच, की मी दुष्ट नाही. तुझ्या हातून सोडवणारा कोणी नाही.


आम्ही तुझ्या साहाय्याने आपल्या शत्रूंना उलथून टाकू; आमच्यावर उठणार्‍यांना तुझ्या नावाने पायदळी तुडवू.


अहो देवाला विसरणार्‍यांनो, ह्याचा विचार करा, नाहीतर मी तुम्हांला फाडून टाकीन, तेव्हा तुम्हांला कोणी सोडवणारा सापडणार नाही.


नाहीतर सिंहाप्रमाणे तो मला फाडून टाकील; मला सोडवणारा कोणी नाही म्हणून तो माझे तुकडेतुकडे करील.


अशक्त झालेल्यांना तुम्ही आपल्या अंगाने व खांद्याने धक्के देता व आपल्या शिंगांनी हुंदडून हाकून देता;


त्याच्यावर चढाई करणारा आपल्या इच्छेस येईल तसे करील व त्याच्यासमोर कोणी टिकाव धरणार नाही; तो आपल्या हाती प्रत्यक्ष नाश घेऊन त्या वैभवी देशात उभा राहील.


तो राजा मनास येईल तसे वर्तेल; तो उन्मत्त होईल; सर्व दैवतांहून तो स्वतःला श्रेष्ठ समजेल आणि देवाधिदेवाविरुद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल; कोपाची पूर्णता होईपर्यंत त्याची चलती राहील; जे नेमले आहे ते घडेलच.


त्याने त्याला मोठेपणा दिला म्हणून सर्व लोक, सर्व राष्ट्रांचे व सर्व भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्याला भीत; वाटेल त्याला तो ठार मारी व वाटेल त्याला जिवंत राखी; वाटेल त्याला तो थोर करी व वाटेल त्याला तो नीच करी.


त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याचा वध झाला.


मी आणखी पाहिले की दुसरे एक श्वापद अस्वलासारखे होते; ते एक अंग वर करून उभे राहिले, त्याने आपल्या तोंडात, आपल्या दातांमध्ये तीन फासोळ्या धरल्या होत्या; लोक त्याला म्हणाले, “ऊठ, पुष्कळ मांस खा.”


मी पाहिले तेव्हा तो त्या एडक्याजवळ गेला, व त्याने क्रोधाने खवळून त्या एडक्यास धडक मारली व त्याची दोन्ही शिंगे मोडून टाकली; त्याच्यापुढे टिकाव धरण्याची त्या एडक्यास शक्ती नव्हती; त्या बकर्‍याने त्याला जमिनीवर पाडून तुडवले; त्या एडक्याला त्याच्या हातातून सोडवण्याचे कोणाला सामर्थ्य नव्हते.


वनपशूंत सिंह, मेंढरांत तरुण सिंह गेला असता तो त्यांना तुडवून फाडतो, कोणाच्याने त्यांचे रक्षण करवत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक राष्ट्रांत, बहुत लोकांत होतील.


प्रथमजन्मलेल्या गोर्‍ह्यासारखा त्याचा प्रताप आहे; त्याची शिंगे रानबैलाच्या शिंगांप्रमाणे होत; त्यांनी तो सर्व राष्ट्रांना पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हुंदडील; असे एफ्राइमाचे लाखो व मनश्शेचे हजारो आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan