Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 8:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तो आपल्या काव्याने आपल्या हातची कारस्थाने सिद्धीस नेईल; तो उन्मत्त होऊन निर्भय असलेल्या पुष्कळ लोकांचा नाश करील; तथापि त्याच्यावर कोणाचा हात न पडता तो नाश पावेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तो कपटाने आपली कारस्थाने सिध्दीस नेईल तसेच तो अधिपतींच्या अधिपतींविरुद्ध विरोधात उठेल आणि त्याचा चुराडा होईल पण मनुष्याच्या बलाने नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 तो कपटाचा उपयोग समृद्ध होण्यास करेल आणि तो स्वतःला श्रेष्ठ समजेल. जेव्हा त्यांना सुरक्षित वाटेल तेव्हा तो अनेकांचा नाश करेल आणि राजपुत्रांच्या राजपुत्राच्या विरोधात उभा राहील. तरीही तो नष्ट होईल, परंतु मनुष्याच्या सामर्थ्याने नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 8:25
21 Iomraidhean Croise  

लोक क्षणात मृत्यू पावतात, ऐन मध्यरात्री झटका खाऊन गत होतात; बलिष्ठ जन कोणाचा हात न लागता उच्छेद पावतात.


त्याला बेहोश करा, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध बढाई मारली आहे; मवाब आपल्या वांतीत लोळेल, तो हास्यविषय होईल.


सदोमेवर कोणी हात टाकला नसून एका क्षणात तिचा नि:पात झाला; तिच्या पापापेक्षा माझ्या लोकांच्या कन्येचे दुष्कर्म अधिक झाले आहे.


लष्कर जसजसे पुढे चाल करील तसतसे त्याचे मन उन्मत्त होईल; तो लाखो लोकांना चीत करील तरी तो यशस्वी होणार नाही.


समुद्राच्या व शोभिवंत पवित्र पर्वतांच्या दरम्यान तो आपले दरबारी तंबू ठोकील; पण त्याचा अंत येईल, कोणी त्याला साहाय्य करणार नाही.”


पण न्यायसभा भरेल, त्याचे प्रभुत्व काढून घेतील, त्याचा नाश करतील व त्याचा कायमचा नायनाट करतील.


मी ती शिंगे न्याहाळून पाहत असता, पाहा, त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले; त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगांपैकी तीन समूळ उपटली गेली; आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यांसारखे डोळे होते व त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते.


एवढेच नव्हे तर त्या गणांच्या अधिपतीबरोबर तो स्पर्धा करू लागला; त्याला नित्य होत असलेले यज्ञयाग त्याने बंद केले आणि त्याचे पवित्रस्थान पाडून टाकले.


हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त,1 अधिपती असा जो तो येईपर्यंत सात सप्तकांचा अवकाश आहे व बासष्ट सप्तके लोटल्यावर1 धामधुमीचा काळ असताही नगर, रस्ते व खंदक ह्यांसह बांधतील.


त्याने देवाचा गौरव केला नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला.


कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो पापपुरुष प्रकट होईल.


मग तो अनीतिमान पुरुष प्रकट होईल, त्याला प्रभू येशू ‘आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील’, आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील.


हे कोकर्‍याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यांना जिंकील, कारण तो ‘प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे;’ आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत.”


त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan