Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मी दृष्टान्तात पाहिले तर मला असे दिसून आले की मी एलाम परगण्यातल्या शूशन राजवाड्यात आहे; आणखी मी दृष्टान्तात पाहिले तेव्हा मी उलई नदीतीरी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मला दृष्टांतात दिसले ते असे, मी पाहत होतो तेव्हा मी एलाम परगण्यातील शूशन, तटबंदीच्या शहरात होतो. मी दृष्टांतात पाहिले तो मी उलई नदीच्या काठी होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 माझ्या दृष्टान्तात मी असे पाहिले की, मी एलाम प्रांतातील शूशनच्या किल्ल्यात आहे; मी दृष्टान्तात उलई नदीकाठी उभा होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 8:2
24 Iomraidhean Croise  

शेमाचे मुलगे : एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.


शिनाराचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा कदार्लागोमर आणि गोयिमाचा राजा तिदाल ह्यांच्या दिवसांत असे झाले की,


हखल्याचा पुत्र नहेम्या ह्याचा वृत्तान्त : विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात होतो,


अहश्वेरोश राजाने शूशन राजवाड्यातल्या आपल्या सिंहासनावर बसल्यानंतर


राजाची आज्ञा व त्याचा ठराव प्रसिद्ध झाल्यावर बहुत कुमारी शूशन राजवाड्यात हेगेच्या हवाली करण्यात आल्या; तेव्हा एस्तेर हिलाही राजमंदिरातील स्त्रियांचा रक्षक हेगे ह्याच्या ताब्यात दिले.


हा हुकूम शूशन राजवाड्यात देण्यात आला आणि राजाज्ञेने जासूद त्वरित निघून गेले; त्या प्रसंगी राजा व हामान हे प्यायला बसले; पण शूशन नगर चिंताक्रांत झाले.


एस्तेर म्हणाली, “हा विरोधी व हा शत्रू कोण म्हणून विचाराल तर हा दुष्ट हामानच.” हे ऐकून राजा व राणी ह्यांच्यापुढे हामान घाबरला;


मग मर्दखय निळ्या, पांढर्‍या रंगाची राजकीय वस्त्रे लेवून, डोक्यांवर सोन्याचा मुकुट ठेवून व तलम सणाचा व जांभळ्या रंगाचा झगा घालून राजासमोरून निघाला; तेव्हा शूशन नगराचे लोक आनंदाने जयघोष करू लागले.


त्या दिवशी शूशन राजवाड्यात ज्यांचा वध झाला त्यांची यादी राजाकडे आणली.


शूशन येथील यहूद्यांनी अदार महिन्याच्या चतुर्दशीसही एकत्र होऊन शूशन येथील तीनशे पुरुष मारले; पण त्यांनी लुटीस हात लावला नाही.


त्या दिवशी असे होईल की अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व समुद्रतीरींचे प्रदेश येथून प्रभू आपल्या लोकांचा अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसर्‍यांदा सोडवील.


मला कष्टप्रद दृष्टान्त झाला आहे; लुटारू लुटत आहे, ठक ठकबाजी करीत आहे. हे एलामा, चढाई कर; हे मादया, वेढा घाल; त्याच्यामुळे लोक टाकत असलेले सर्व उसासे मी थांबवतो.


जिम्री, एलाम व मेदी ह्यांच्या सर्व राजांना,


मी खबार नदीच्या तीरी पकडून आणलेल्या लोकांत राहत होतो, तेव्हा तिसाव्या वर्षाच्या चौथ्या मासी पंचमीस असे झाले की आकाश दुभागून मला दिव्य दृष्टान्त दिसले.


तेथे एलाम आहे व तिचा सर्व समुदाय तिच्या कबरेसभोवती आहे; जे जिवंतांच्या भूमीस दहशत घालीत ते सर्व वध पावले आहेत, तलवारीने पडले आहेत; ते बेसुंती अधोलोकी गेले आहेत; गर्तेत उतरणार्‍यांबरोबर ते अप्रतिष्ठा पावले आहेत.


पहिल्या महिन्याच्या चोविसाव्या तारखेस महानदी हिद्दकेल (टायग्रीस) हिच्या तीरी मी असता


मग मी दानीएल तर असा झालो की, माझ्या ठायी माझा जीव घाबरा झाला; माझ्या डोक्यात घोळणार्‍या दृष्टान्तांमुळे मी चिंताक्रांत झालो.


दानिएलाने म्हटले, “मी रात्री दृष्टान्तात पाहिले तर चार्‍ही दिशांचे वारे महासागरावर सुटले;


मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टान्त झाला होता, त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी मला पुन्हा दृष्टान्त झाला.


मी डोळे वर करून पाहिले तर मला नदीसमोर दोन शिंगांचा एक एडका दिसला; ती दोन्ही शिंगे मोठाली होती; त्यांतले एक दुसर्‍याहून मोठे असून मागाहून निघाले होते.


परमेश्वर त्यांना म्हणाला, “माझे शब्द ऐका, तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टान्तात प्रकट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करत असतो.


देव प्राचीन काळी अंशाअंशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला.


त्या दृष्टान्तात घोडे व त्यांच्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे : त्यांना अग्नी, नीळ व गंधक ह्यांच्या रंगांची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती; आणि त्यांच्या तोंडांतून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan