Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 8:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तो म्हणाला, “पाहा, कोपाच्या शेवटल्या काळात काय होईल हे मी तुला सांगतो; कारण नेमलेल्या अंतसमयासंबंधाने हा दृष्टान्त आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तो म्हणाला, “बघ, कोपाच्या काळात काय होईल ते मी तुला दाखवतो, कारण तो दृष्टांत शेवटच्या नेमलेल्या दिवसाचा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तो म्हणाला: “क्रोधाच्या अखेरच्या समयात काय घडणार आहे हे मी तुला सांगणार आहे, कारण हा दृष्टान्त नेमलेल्या काळाच्या समाप्तीच्या संबंधी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 8:19
15 Iomraidhean Croise  

तू उठून सीयोनेवर दया करशील; कारण तिच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे. नेमलेला समय येऊन ठेपला आहे;


दोन्ही राजांची मने दुष्कृत्ये करण्याकडे वळतील; ते एका मेजावर बसून परस्परांबरोबर खोटे बोलतील; पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही; कारण शेवट व्हायचा तो नेमलेल्या वेळीच होणार.


हे दानिएला, तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव; पुष्कळ लोक इकडून तिकडे फिरतील व ज्ञानवृद्धी होईल.


त्या राज्यांचा शेवट जवळ येऊन पातक्यांच्या पापाचा घडा भरला म्हणजे उग्रस्वरूपी, कूटप्रश्‍न समजणारा असा राजा उभा राहील.


कारण हा दृष्टान्त नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करत आहे, तो फसवायचा नाही; त्याला विलंब लागला, तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला विलंब लागायचा नाही.


त्या दिवसांत ज्या गरोदर व अंगावर पाजणार्‍या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण देशावर मोठे संकट येईल व ह्या लोकांवर कोप होईल.


येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण : हे त्याला देवाकडून झाले. ‘ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या’ आपल्या दासांना दर्शवण्याकरता हे झाले; आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्याला कळवले.


तर सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसांत म्हणजे तो देवदूत कर्णा वाजवण्याच्या बेतात असेल, तेव्हा देवाने ‘आपले दास संदेष्टे’ ह्यांना जाहीर केल्यानुसार ‘त्याचे गूज’ पूर्ण होईल.


‘राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली,’ तुझ्या ‘क्रोधाची’ वेळ आली; मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि ‘तुझे दास संदेष्टे’ व तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहानथोर ह्यांना वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीची नासाडी करणार्‍यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.”


नंतर मी अत्यंत आश्‍चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले; ‘सात पीडा’ घेतलेले सात देवदूत दृष्टीस पडले; त्या पीडा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला.


त्यांनी एकविचाराने वागून देवाची वचने पूर्ण होईपर्यंत आपले राज्य श्वापदाला द्यावे अशा इराद्याने कृती करण्याचे देवाने त्यांच्या मनात घातले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan