दानीएल 8:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा मी एका पवित्र पुरुषाला बोलताना ऐकले; दुसरा एक पवित्र पुरुष त्या बोलणार्यास म्हणाला, “हा नित्याचा यज्ञयाग, विध्वंसमूलक पातक, पवित्रस्थान व सैन्य ही पायांखाली तुडवणे, ह्या दृष्टान्तात पाहिलेल्या गोष्टी कोठवर चालणार?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 नंतर मी एका पवित्र पुरुषास, दुसऱ्या पवित्र पुरुषासोबत बोलताना ऐकले, “हा रोजचा यज्ञयांग नाशदायी पाप, वेदी आणि सैन्य तुडवणे, या दृष्टांतातील गोष्टी किती दिवस चालत राहणार?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 नंतर एका पवित्रजनाला बोलताना मी ऐकले आणि दुसरा पवित्रजन त्याला म्हणाला, “दृष्टान्त पूर्ण होण्यास किती काळ लागेल—त्या दृष्टान्तामध्ये रोजचे अर्पण, विध्वंसक पातक ज्यामुळे ओसाडी येते, पवित्रस्थानाचे समर्पण आणि याहवेहच्या लोकांना पायदळी तुडविले जाणे हे दाखविले आहे?” Faic an caibideil |
आणि महाराजांनी असे पाहिले की, एक जागल्या, पवित्र पुरुष, आकाशातून उतरून म्हणाला, हा वृक्ष तोडून ह्याचा नाश करा; तथापि ह्याचे बुंध जमिनीत राहू द्या; ह्याला लोखंड व पितळ ह्यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या; ह्याला आकाशातल्या दहिवराने भिजू द्या; ह्याला वनपशूंबरोबर वाटा मिळो, ह्याच्यावरून सात काळ जावोत तोवर असे होवो.
आदामापासून सातवा पुरुष हनोख ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला आहे की, “पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करण्यास आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यांवरून, त्या सर्वांना दोषी ठरवण्यास प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.”1