Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 8:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 लोकांच्या पातकास्तव ते सैन्य नित्याच्या यज्ञयागांसहित त्याच्या स्वाधीन करण्यात आले; त्याने सत्य मातीस मिळवले; त्याने आपला मनोरथ सिद्धीस नेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आणि लोकांच्या पातकामुळे नित्याच्या होमार्पणासहित ते सैन्य त्याच्या स्वाधीन करण्यात आले; तेव्हा त्याने सत्य मातीस मिळवले; आणि ते कार्य करीत व समृद्ध होत गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 दैनंदिन यज्ञ बंडखोरीमुळे याहवेहचे लोक त्याच्या हाती देण्यात आले. त्याने जे काही केले त्यात उन्नती केली आणि सत्य मातीला मिळविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 8:12
14 Iomraidhean Croise  

लुटारूंचे डेरे समृद्ध असतात, जे देवाला चेतवतात ते निर्भय राहतात, ते आपल्या हातालाच आपला देव समजतात.1


तुझे न्याय्यत्व हे सनातन न्याय्यत्व आहे, आणि तुझे नियमशास्त्र सत्य आहे.


तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून सर्वथा नाहीसे होऊ देऊ नकोस, कारण मी तुझ्या निर्णयांची आशा धरली आहे.


परमेश्वराची कृत्ये, त्याच्या हातची कृती, ते ध्यानात आणीत नाहीत म्हणून तो त्यांना जमीनदोस्त करील, उभारणार नाही.


न्यायाला मागे ढकलले आहे. नीतिमत्ता लांब उभी राहिली आहे; कारण चव्हाठ्यांवर सत्य अडखळून पडले आहे, तेथे सरळतेचा प्रवेश होत नाही.


हे परमेश्वरा, मी तुझ्याशी वाद घालू लागलो तर तू न्यायीच ठरशील; तरी मी तुझ्याशी असा वाद करतो की दुष्टांचा मार्ग का सफल होतो? बेइमानी करणार्‍या सर्वांना सुखसमाधान का प्राप्त होते?


मग तो मोठी लूट घेऊन स्वदेशी परत जाईल; त्याचे मन पवित्र कराराविरुद्ध होईल आणि तो आपला मनोरथ पूर्ण करून स्वदेशी परत जाईल.


मी पाहिले तो त्या शिंगाने पवित्र जनांबरोबर युद्ध केले, व त्याचे त्यांच्यावर प्राबल्य झाले.


तो एडका पश्‍चिमेस, उत्तरेस व दक्षिणेस धडका मारीत आहे असे मी पाहिले; कोणी पशू त्याच्यासमोर उभा राहीना, व त्याच्या तडाक्यातून एखाद्यास सोडवायचे कोणास सामर्थ्य नव्हते; तो आपल्या मनास येई तसे करी, असा तो प्रबल झाला.


‘पवित्र जनांबरोबर लढण्याची व त्यांना जिंकण्याची’ त्याला मुभा देण्यात आली; आणि सर्व वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यांवर त्याला अधिकार देण्यात आला.


शौल आपला नाश करण्याची मसलत करीत आहे हे दाविदाला समजले तेव्हा तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan