Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 8:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्याची वृद्धी आकाशगणांपर्यंत होऊन त्या गणांपैकी व त्या तार्‍यांपैकी काहींना त्याने जमिनीवर पाडून तुडवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्याची वाढ इतकी झाली की ते आकाशातील सैन्याबरोबर लढू शकेल काही सैन्य आणि काही तारे त्याने जमिनीवर पाडून तुडवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तो आकाशाच्या सैन्यापर्यंत पोहोचेपर्यंत वाढला आणि त्याने काही ताऱ्यांचे सैन्य पृथ्वीवर फेकले आणि त्यांना तुडविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 8:10
9 Iomraidhean Croise  

जो तू आपल्या मनात म्हणालास, ‘मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन;


त्याला बेहोश करा, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध बढाई मारली आहे; मवाब आपल्या वांतीत लोळेल, तो हास्यविषय होईल.


मग तो मोठी लूट घेऊन स्वदेशी परत जाईल; त्याचे मन पवित्र कराराविरुद्ध होईल आणि तो आपला मनोरथ पूर्ण करून स्वदेशी परत जाईल.


कारण कित्तिमाची जहाजे त्याच्यावर चाल करून येतील, म्हणून तो खिन्न होऊन मागे फिरेल आणि पवित्र करारावर रुष्ट होऊन आपल्या मनास वाटेल तसे करील; तो परत जाईल व पवित्र करार सोडणार्‍यांबरोबर स्नेह करू पाहील.


ह्यानंतर मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तो पाहा, एक चौथे श्वापद विक्राळ, भयानक व अतिशय बळकट असे होते; त्याला मोठाले लोखंडी दात होते; ते सर्वकाही चावून त्याचा चुरा करी व उरलेले आपल्या पायांखाली तुडवी; ते अगोदरच्या सर्व श्वापदांहून भिन्न होते; आणि त्याला दहा शिंगे होती.


मी पाहिले तेव्हा तो त्या एडक्याजवळ गेला, व त्याने क्रोधाने खवळून त्या एडक्यास धडक मारली व त्याची दोन्ही शिंगे मोडून टाकली; त्याच्यापुढे टिकाव धरण्याची त्या एडक्यास शक्ती नव्हती; त्या बकर्‍याने त्याला जमिनीवर पाडून तुडवले; त्या एडक्याला त्याच्या हातातून सोडवण्याचे कोणाला सामर्थ्य नव्हते.


त्याच्या शेपटाने ‘आकाशातील तार्‍यांपैकी एक तृतीयांश तारे’ ओढून काढून ते ‘पृथ्वीवर पाडले’; ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणार्‍या स्त्रीपुढे उभा राहिला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan