Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 7:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारुढ झाला; त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते; त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते; व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मी पाहत होतो तेव्हा, आसने मांडण्यात आली; आणि एक पुराणपुरूष आसनावर बसला. त्याची वस्त्रे हिमाप्रमाणे शुभ्र होती आणि त्याचे केस लोकरीसारखे स्वच्छ होते. त्याचे आसन आग्नीज्वाला होते. आणि त्याची चाके जळणारा अग्नी होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “जसे मी पाहिले, “सिंहासने मांडली गेली आणि प्राचीन पुरुष आपल्या आसनावर बसला आहे. त्याची वस्त्रे हिमासारखी शुभ्र होती; त्याच्या मस्तकावरील केस लोकरीप्रमाणे पांढरे होते. त्याचे सिंहासन अग्निज्वालायुक्त होते, आणि त्याच्या सिंहासनाची चाके प्रज्वलित केलेल्या अग्नीप्रमाणे होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 7:9
34 Iomraidhean Croise  

मीखाया म्हणाला, “तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक : परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले.


मीखाया म्हणाला, “तर आता तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका; परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झाला आहे व त्याच्या उजवीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले.


तुझ्या सर्व वस्त्रांना बोळ, ऊद व दालचिनी ह्यांचा सुगंध येत आहे; हस्तिदंती राजमंदिरातील तंतुवाद्ये तुला आनंदित करतात.


पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, तू पृथ्वी व जग निर्माण केलेस त्यापूर्वीच अनादि कालापासून अनंतकालापर्यंत तू देव आहेस.


तुझे राजासन पुरातन कालापासून स्थिर आहे; तू अनादि कालापासून आहेस.


उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूला उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले; त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते.


कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.


मी एलामात आपले सिंहासन मांडीन आणि तेथून राजा व सरदार ह्यांचा नाश करीन, असे परमेश्वर म्हणतो.


त्यांच्या डोक्यांवर असलेल्या चांदव्यावर नीलमण्याच्या सिंहासनासारखे काही दिसत होते आणि त्या सिंहासनावर पुरुष असल्याचा भास होत होता.


तेव्हा मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तर आकाशातील मेघांवर आरूढ होऊन, मानवपुत्रासारखा कोणी आला; तो त्या पुराणपुरुषाकडे आला व त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले.


शेवटी पुराणपुरुष आला तेव्हा परात्पर देवाच्या पवित्र जनांना न्याय मिळाला आणि त्या पवित्र जनांना राज्याचे स्वामित्व मिळण्याचा समय आला; ह्याचेही मर्म कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली.


हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.


हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्र प्रभू, तू अनादि काळापासून आहेस ना? आम्ही मरणार नाही.1 हे परमेश्वरा, तू त्यांचा न्याय नेमला आहेस. हे दुर्गा, त्याचे शासन व्हावे म्हणून तू त्याला स्थापले आहेस.


तेव्हा त्याचे रूप त्यांच्यादेखत पालटले; त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली.


त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते.


आणि त्याची वस्त्रे चकचकीत व इतकी पांढरीशुभ्र झाली की तितकी पांढरीशुभ्र करणे पृथ्वीवरील कोणाही परिटाला शक्य नाही.


तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की, देव ‘शपथ वाहून त्याला म्हणाला, देहाप्रमाणे तुझ्या संतानांतील एकाला (म्हणजे ख्रिस्ताला) तुझ्या राजासनावर बसवण्यासाठी मी उठवीन.’


म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसवलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.


आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व — माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे — तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे असावे.


आणि कोणी पाहू शकत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाळी दाखवील; त्याला सन्मान व पराक्रम युगानुयुग आहे. आमेन.


जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हांला विदित करतो; तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही.


‘त्याचे डोके’ व ‘केस बर्फासारख्या पांढर्‍या लोकरीसारखे,’ पांढरे होते; ‘त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते,’


राजाचे’ मांस, सरदारांचे मांस, ‘बलवानांचे मांस, घोड्यांचे’ व त्यांवरील स्वारांचे मांस, आणि स्वतंत्र व दास, लहानमोठे, अशा सर्वांचे मांस ‘खाण्यास’ या.”


नंतर ‘मी राजासने पाहिली,’ त्यांच्यावर ‘कोणी बसले होते;’ त्यांना ‘न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता;’ आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता, आणि ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळांवर व आपल्या हातांवर त्याची खूण धारण केलेली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले; ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.


लगेचच मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा पाहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते, आणि ‘त्या राजासनावर कोणीएक बसलेला होता.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan