Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 7:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मी आणखी पाहिले की दुसरे एक श्वापद अस्वलासारखे होते; ते एक अंग वर करून उभे राहिले, त्याने आपल्या तोंडात, आपल्या दातांमध्ये तीन फासोळ्या धरल्या होत्या; लोक त्याला म्हणाले, “ऊठ, पुष्कळ मांस खा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 नंतर दुसरे श्वापद अस्वलासारखे होते त्याच्या दातामध्ये तिन फासोळया धरल्या होत्या. त्यास सांगण्यात आले ‘उठ, पुढे पुष्कळ मांस खा.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “आणि तिथे मी माझ्यापुढे दुसरा पशू पाहिला, जो अस्वलासारखा दिसत होता. त्याच्या शरीराची एका बाजू वर उचललेली होता. त्याने आपल्या दातांमध्ये तीन फासळ्या धरल्या होत्या. त्याला सांगण्यात आले, ‘ऊठ! पोटभर मांस खा!’

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 7:5
14 Iomraidhean Croise  

त्याने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले व परमेश्वराचे नाव घेऊन त्यांना शाप दिला. तेव्हा वनातून दोन अस्वली बाहेर पडल्या व त्यांनी त्यांच्यातल्या बेचाळीस पोरांना फाडून टाकले.


जिची पिले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली पुरवली, पण मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची गाठ न पडो.


रानातील सर्व पशूंनो, वनातील सर्व पशूंनो, या, खाऊन टाकण्यास या.


आता मी तुला खरे काय ते दाखवून देतो. पाहा, पारस देशात तीन राजे उत्पन्न होतील; चौथा त्या सर्वांहून धनवान होईल; तो आपल्या धनाच्या योगाने बलाढ्य झाला म्हणजे तो सर्वांना ग्रीसच्या1 राज्याविरुद्ध उठवील.


आपल्यानंतर आपल्याहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल; आणि पितळेचे असे तिसरे राज्य होईल; ते सर्व पृथ्वीवर सत्ता चालवील.


परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी ह्यांना दिले आहे.”


पहिले सिंहासारखे असून त्याला गरुडाचे पंख होते; मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्याला जमिनीवरून उचलण्यात आले; त्याला मानवाप्रमाणे दोन पायांवर उभे केले; त्याला मानवाचे हृदय दिले.


ह्यानंतर मी पाहिले तर आणखी एक श्वापद चित्त्यासारखे दिसले; त्याच्या पाठीवर पक्ष्याचे चार पंख होते; त्या श्वापदाला चार शिरेही होती; त्याला अधिकार दिला होता.


जिची पिले हरण केली आहेत अशा अस्वलीसारखा मी त्यांच्यावर हल्ला करीन, मी त्यांचे ऊर फाडून टाकीन, मी त्यांना तेथे सिंहासारखे खाऊन टाकीन; वनपशू त्यांना फाडून त्यांचे तुकडे-तुकडे करतील.


जे ‘श्वापद’ मी पाहिले ते ‘चित्त्यासारखे’ होते, त्याचे पाय ‘अस्वलाच्या’ पायांसारखे होते व त्याचे तोंड ‘सिंहाच्या’ तोंडासारखे होते; त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan