Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 7:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मी पाहिले तो त्या शिंगाने पवित्र जनांबरोबर युद्ध केले, व त्याचे त्यांच्यावर प्राबल्य झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मी पाहिले त्या शिंगाने पवित्र जनांविरोधात युध्द करून त्यांच्यावर विजय मिळवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 मी पाहिले की, हे शिंग पवित्र लोकांशी युद्ध करीत आहे आणि त्यांचा पराभव करीत राहिले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 7:21
12 Iomraidhean Croise  

त्याच्या पक्षाचे सैनिक उठावणी करतील; ते पवित्रस्थान, तो दुर्ग, ते भ्रष्ट करतील, नित्याचे बलिहवन ते बंद करतील आणि विध्वंसमूलक अमंगलाची ते स्थापना करतील.


तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष नदीच्या पाण्यावर होता त्याने आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर करून, जो सदाजीवी त्याची शपथ वाहून म्हटल्याचे मी ऐकले, “एक समय, दोन समय व अर्धा समय एवढा अवधी आहे; पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे संपेल तेव्हा ह्या सर्व गोष्टी पूर्ण होतील.”


त्याच्या डोक्याला दहा शिंगे असून आणखी एक शिंग निघाले त्यामुळे तीन शिंगे उपटून पडली; ह्या शिंगाला डोळे व मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड असून ते आपल्याबरोबरच्या इतर शिंगांहून लठ्ठ दिसत होते; ह्या सगळ्यांचे मर्म काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली.


लोकांच्या पातकास्तव ते सैन्य नित्याच्या यज्ञयागांसहित त्याच्या स्वाधीन करण्यात आले; त्याने सत्य मातीस मिळवले; त्याने आपला मनोरथ सिद्धीस नेला.


त्याची सत्ता बलवत्तर होईल; तथापि ती अशी त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने होणार नाही; तो विलक्षण नाश करील. तो उत्कर्ष पावेल आणि आपला मनोरथ सिद्धीस नेईल; तो समर्थ व पवित्र लोकांचा नाश करील.


त्यांतल्या एका शिंगातून एक लहान शिंग निघाले; त्याची दृष्टी दक्षिणेस, पूर्वेस व त्या वैभवी देशाकडे पराकाष्ठेची झाली.


हे कोकर्‍याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यांना जिंकील, कारण तो ‘प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे;’ आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत.”


ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या रक्तसाक्ष्यांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्‍चर्य वाटले.


तेव्हा ते श्वापद, ‘पृथ्वीवरील राजे’ व त्यांची सैन्ये ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करण्यास ‘एकत्र झालेली’ मी पाहिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan