Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 7:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, ह्यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली; त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आणि त्यास प्रभुत्व व वैभव व राज्य दिले, ते असे की, सर्व लोक, राष्ट्रे व भाषा यांनी त्याची सेवा करावी; त्याचे प्रभुत्व सनातन प्रभुत्व आहे, ते टळून जायचे नाही, आणि जे नष्ट व्हायचे नाही असे त्याचे राज्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्याला अधिकार, गौरव व सार्वभौम सामर्थ्य देण्यात आले; सर्व राष्ट्रांनी आणि प्रत्येक सर्व भाषा बोलणार्‍यांनी त्याची उपासना केली. त्याचे सामर्थ्य शाश्वतचे आहे, जे कधीही ढळणार नाही आणि त्याचा कधी अंत होत नाही आणि म्हणून त्याचे राज्य हे असे राज्य आहे, ज्याचा कधीही नाश होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 7:14
41 Iomraidhean Croise  

परमेश्वराची उपासना करण्यास लोक व राज्ये एकत्र होतील तेव्हा असे होईल.


परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे; त्याचे राज्य सर्वांवर आहे.


तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे.


परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो; हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करतो. परमेशाचे स्तवन करा!1


तुझे राजासन देवाच्या राजासनासारखे युगानुयुगाचे आहे;1 तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे.


सर्व राजे त्याला दंडवत घालोत; सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत.


त्याचे नाव सर्वकाळ राहो; सूर्य आहे तोवर त्याचे नाव वृद्धिंगत होवो; त्याच्या नावाने लोक आपणांस धन्य म्हणोत; सर्व राष्ट्रे त्याचा धन्यवाद करोत.


तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहेस, तू सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेवले आहेस.


वात्सल्याचे सिंहासन स्थापले आहे; त्यावर दाविदाच्या डेर्‍यात कोणीएक सत्यनिष्ठ विराजमान होईल; तो न्याय करणारा, न्यायप्रिय, नीतिमत्तेत निपुण असा असेल.”


कारण जे राष्ट्र व जे राज्य तुझी सेवा करणार नाही ते विलयास जाईल; अशी राष्ट्रे खातरीने उद्ध्वस्त होतील.


कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.


त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


तेव्हा लोखंड, माती, पितळ, रुपे व सोने ह्यांचे चूर्ण होऊन उन्हाळखळ्यातील भुसाप्रमाणे ती झाली. वार्‍याने ती उधळून नेली; त्यांचा मागमूस राहिला नाही; त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली.


महाराज, आपण राजाधिराज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज्य, पराक्रम, बल व वैभव ही दिली आहेत;


त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसर्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते ह्या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांना नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.


मग एका भाटाने मोठ्याने घोषणा केली की, “अहो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रांतील निरनिराळ्या भाषा बोलणार्‍या लोकांनो, तुम्हांला आज्ञा होत आहे की,


त्याची चिन्हे किती थोर! त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा! त्याचे राज्य सर्वकालचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे.


मी फर्मावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे; कारण तो जिवंत देव आहे; तो सर्वकाळ जवळ आहे; त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे.


तथापि परात्पर देवाचे जे पवित्र जन त्यांना राज्य प्राप्त होईल; ते राज्य सर्वकाळ युगानुयुग, त्यांच्या ताब्यात राहील.’


राज्य, प्रभुत्व व संपूर्ण आकाशाखालील राज्यांचे वैभव ही परात्पर देवाची प्रजा जे पवित्र जन ह्यांना देण्यात येतील; त्याचे राज्य सनातन आहे, सर्व सत्ताधीश त्याची सेवा करतील, त्याचे अंकित होतील.”


एसावाच्या पहाडाचा न्याय करायला उद्धारकर्ते सीयोन डोंगरावर येतील आणि राज्य परमेश्वराचे होईल.


मी लंगड्यांना अवशेष म्हणून ठेवीन, दूर घालवलेल्यांचे मी समर्थ राष्ट्र करीन; आणि येथून पुढे सदासर्वकाळ परमेश्वर सीयोन डोंगरात त्यांच्यावर राज्य करील.


माझ्या पित्याने माझ्या हाती सर्वकाही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल, त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.


तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.


आणि तो याकोबाच्या घराण्यावर ‘युगानुयुग राज्य करील’, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”


माझ्या पित्याने सर्वकाही माझ्या स्वाधीन केले आहे; पुत्र कोण आहे हे पित्यावाचून कोणाला ठाऊक नाही; आणि पिता कोण आहे हे पुत्रावाचून व ज्याला तो प्रकट करायची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून कोणाला ठाऊक नाही.”


म्हणून लोकांनी त्याला विचारले, “ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?”


पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्या हाती दिले आहे.


म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्याकारणाने आपण उपकार मानू; तेणेकरून देवाला संतोषकारक1 होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू;


तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता ‘देवाच्या उजवीकडे’ आहे, त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत.


आणि आपल्याला ‘राज्य’ आणि आपला देव व पिता ह्याच्यासाठी ‘याजक’ असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन.


सातव्या देवदूताने कर्णा वाजवला; तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्या : “जगाचे ‘राज्य’ आमच्या ‘प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे’ झाले आहे; आणि ‘तो युगानुयुग राज्य करील.”’


हे कोकर्‍याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यांना जिंकील, कारण तो ‘प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे;’ आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत.”


मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan