Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 7:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तेव्हा मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तर आकाशातील मेघांवर आरूढ होऊन, मानवपुत्रासारखा कोणी आला; तो त्या पुराणपुरुषाकडे आला व त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 त्या रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहिले, आकाशातील मेघावर स्वार होऊन कोणी मानवपूत्रासारखा येताना मी पाहिला तो पुराणपुरूषाकडे आला व त्यास त्याने जवळ केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “नंतर रात्री दृष्टान्तात पाहत होतो आणि मी पाहिले, मानवपुत्रासारखा आकाशात मेघारूढ होऊन येत असलेला दिसला. तो प्राचीन पुरुषाकडे गेला आणि त्याच्या उपस्थितीत त्याला सादर करण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 7:13
39 Iomraidhean Croise  

परमेश्वर तुझे बलवेत्र सीयोनेतून पुढे नेईल; तो म्हणतो, “तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.”


माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन;


जयघोष होत असता देव वर गेला आहे, कर्ण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे.


पाहा, तो यार्देनेच्या घोर अरण्यामधून येणार्‍या सिंहाप्रमाणे त्या मजबूत वस्तीवर येईल; मी अदोमास त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन, व ज्याला निवडतील त्याला तिच्यावर नेमीन; कारण माझ्यासमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?


त्यांच्या डोक्यांवर असलेल्या चांदव्यावर नीलमण्याच्या सिंहासनासारखे काही दिसत होते आणि त्या सिंहासनावर पुरुष असल्याचा भास होत होता.


त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसर्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते ह्या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांना नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.


इतर श्वापदांविषयी म्हणाल तर त्यांचा अधिकार हरण करण्यात आला; तरी काही मुदतीपर्यंत काही काळपावेतो त्यांचा प्राण वाचवण्यात आला.


दानिएलाने म्हटले, “मी रात्री दृष्टान्तात पाहिले तर चार्‍ही दिशांचे वारे महासागरावर सुटले;


शेवटी पुराणपुरुष आला तेव्हा परात्पर देवाच्या पवित्र जनांना न्याय मिळाला आणि त्या पवित्र जनांना राज्याचे स्वामित्व मिळण्याचा समय आला; ह्याचेही मर्म कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली.


मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारुढ झाला; त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते; त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते; व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती.


मग असे झाले की मी दानिएलाने हा दृष्टान्त पाहिला तेव्हा त्याचा अर्थ काय हे समजण्याचा मी यत्न करू लागलो तेव्हा पाहा, मनुष्यरूपधारी अशा एकास मी माझ्यासमोर उभे राहिलेले पाहिले.


मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील, आणि ते सर्व ‘अडखळवणार्‍यांना व अनाचार करणार्‍यांना’ त्याच्या राज्यातून जमा करून


तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल; मग ‘पृथ्वीवरील सर्व जातींचे लोक शोक करतील’ आणि ते ‘मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन’ पराक्रमाने व मोठ्या वैभवाने ‘येताना’ पाहतील;


जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने ‘सर्व पवित्र देवदूतांसह येईल,’ तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल.


येशू त्याला म्हणाला, “होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हांला सांगतो, ह्यापुढे तुम्ही ‘मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले’ व ‘आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल.”’


तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.


येशू त्याला म्हणाला, “खोकडांना बिळे व आकाशातील पाखरांना कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकण्यास ठिकाण नाही.”


तेव्हा ‘मनुष्याचा पुत्र’ मोठ्या पराक्रमाने व वैभवाने ‘मेघांरूढ होऊन येत असलेला’ दृष्टीस पडेल.


आणि तेव्हा ‘मनुष्याचा पुत्र’ पराक्रमाने व मोठ्या वैभवाने ‘मेघात येताना’ लोकांच्या दृष्टीस पडेल.


तुम्ही तर होणार्‍या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा.”


मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखांतील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.


म्हणून लोकांनी त्याला विचारले, “ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?”


स्वर्गातून उतरलेला [व स्वर्गात असलेला] जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही.


आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला.


आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.”


नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघांरूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू.


आणि कोणी पाहू शकत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाळी दाखवील; त्याला सन्मान व पराक्रम युगानुयुग आहे. आमेन.


ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे,


खर्‍या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्रस्थान ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला.


आणि त्या समयांच्या मध्यभागी ‘मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ वस्त्र परिधान केलेला,’ आणि छातीवरून ‘सोन्याचा’ ‘पट्टा बांधलेला’ असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला;


मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.


‘पाहा, तो मेघांसहित येतो;’ प्रत्येक डोळा त्याला ‘पाहील’, ज्यांनी त्याला ‘भोसकले तेही पाहतील; आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील.’ असेच होणार. आमेन.


नंतर ‘मी पाहिले, तेव्हा’ पांढरा मेघ व त्या ‘मेघावर’ बसलेला ‘मनुष्याच्या पुत्रासारखा’ कोणीएक ‘दृष्टीस पडला;’ त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हातात तीक्ष्ण धारेचा विळा होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan