Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 7:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्याच्यासमोरून अग्निप्रवाह वाहत होता; हजारो लोक त्याची सेवा करीत होते; लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते; न्यायसभा भरली; वह्या उघडल्या गेल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्याच्या समोर अग्नीची नदी वाहत होती, हजारो लोक त्याची सेवा करीत होते, लाखो लोक समोर उभे होते, न्यायसभा चालू होती आणि पुस्तके उघडी होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 अग्नीची नदी निघून वाहत होती जी त्याच्यामधून बाहेर येत होती. हजारोच्या हजार लोक त्याची सेवा करीत होते; कोट्यावधी लोक त्याच्यासमोर उभे होते. न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आणि पुस्तके उघडली गेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 7:10
26 Iomraidhean Croise  

मीखाया म्हणाला, “तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक : परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले.


मीखाया म्हणाला, “तर आता तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका; परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झाला आहे व त्याच्या उजवीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले.


त्याच्या सैन्यांची गणती करता येईल काय? त्याचा प्रकाश कोणावर पडत नाही?


अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जे तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा.


त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता, त्याच्या मुखातून ग्रासणारा अग्नी निघत होता, त्यामुळे निखारे धगधगत होते.


आमचा देव येत आहे, तो उगा राहायचा नाही; त्याच्यापुढे अग्नी ग्रासत चालला आहे. त्याच्याभोवती मोठे वादळ सुटले आहे.


देवाचे रथ वीस हजार आहेत, हजारो हजार आहेत, प्रभू सीनायवरून पवित्रस्थानी आला आहे.


पाहा, परमेश्वराचे नाम दुरून येत आहे, त्याचा क्रोध भडकला आहे, धुराचा लोट चढत आहे; त्याचे ओठ क्रोधाने स्फुरत आहेत, त्याची जिव्हा भस्म करणार्‍या अग्नीसारखी आहे;


कारण पूर्वीच तोफेत (दहनस्थान) तयार केले आहे; ते राजासाठी सिद्ध केले आहे; ते खोल व रुंद केले आहे; त्याच्या चितेसाठी विस्तव व भरपूर लाकडे आहेत; गंधकाच्या धारेसारखा परमेश्वराचा फुंकर ती पेटवतो.


“त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मीखाएल तो उठेल; कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल; तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्या वेळी मुक्त होतील.


शेवटी पुराणपुरुष आला तेव्हा परात्पर देवाच्या पवित्र जनांना न्याय मिळाला आणि त्या पवित्र जनांना राज्याचे स्वामित्व मिळण्याचा समय आला; ह्याचेही मर्म कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली.


पण न्यायसभा भरेल, त्याचे प्रभुत्व काढून घेतील, त्याचा नाश करतील व त्याचा कायमचा नायनाट करतील.


तुम्ही माझ्या डोंगराच्या खोर्‍याकडे धावाल, कारण डोंगरांचे खोरे आसलापर्यंत जाऊन भिडेल; व यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूमिकंपापासून जसे तुम्ही पळाला तसे पळाल; परमेश्वर माझा देव येईल, तुझ्यासमागमे तुझे सर्व भक्त येतील.


जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने ‘सर्व पवित्र देवदूतांसह येईल,’ तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल.


तो म्हणाला, “परमेश्वर सीनायहून आला, सेईरावरून आमच्यावर1 उदय पावला; पारान पर्वतावरून तो प्रकटला, लक्षावधी पवित्रांच्या मधून तो आला, त्याच्या उजव्या हातापासून अग्निज्वाला निघाली.


ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय?


पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत,


आदामापासून सातवा पुरुष हनोख ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला आहे की, “पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करण्यास आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यांवरून, त्या सर्वांना दोषी ठरवण्यास प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.”1


‘राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली,’ तुझ्या ‘क्रोधाची’ वेळ आली; मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि ‘तुझे दास संदेष्टे’ व तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहानथोर ह्यांना वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीची नासाडी करणार्‍यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.”


तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील ह्यांच्याभोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली; आणि त्यांची संख्या ‘अयुतांची अयुते व सहस्रांची सहस्रे होती.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan