Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 7:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 बाबेलचा राजा बेलशस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या पलंगावर पडला असता त्याला स्वप्न पडले व त्याच्या डोक्यात दृष्टान्त घोळू लागले; मग त्याने ते स्वप्न लिहून काढले व त्याचे सार कथन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 बाबेलाचा राजा बेलशस्सर याच्या राज्याच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या पलंगावर पडलेला असता त्यास स्वप्न पडले आणि दृष्टांत त्याच्या मनात फिरू लागले मग त्याने ते स्वप्न आणि त्यातील महत्वाच्या घटना लिहून काढत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 बाबेलचा राजा बेलशस्सर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या बिछान्यावर पडला असताना त्याने स्वप्न पाहिले व मनात दृष्टान्त पाहिला. त्याने आपल्या स्वप्नाचा सारांश लिहून ठेवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 7:1
34 Iomraidhean Croise  

ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : “अब्रामा, भिऊ नको. मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल.”


तेव्हा रात्री दृष्टान्तात देव इस्राएलाशी बोलला, “याकोबा, याकोबा.” तो म्हणाला, “काय आज्ञा?”


रात्री माणसे निद्रावश होतात अशा समयी मला दृष्टान्त होऊन मी विचारलहरींत मग्न झालो असता,


तर आता चल, त्यांच्यासमक्ष हे पाटीवर लिही, टिपून ठेव म्हणजे ते पुढील पिढ्यांसाठी युगानुयुग राहील.


परमेश्वराने मला म्हटले, “एक मोठी पाटी घेऊन तिच्यावर व्यावहारिक लिपीत असे लिही, महेर-शालाल-हाश-बज (लूट त्वरा करते, पारध घाई करते) ह्याविषयी.”


कोणा संदेष्ट्याने स्वप्न पाहिले असेल तर ते तो कथन करो; माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगो. गव्हापुढे पेंढा तो काय? असे परमेश्वर म्हणतो.


सर्व राष्ट्रे त्याची सेवा करतील, त्याच्या पुत्रपौत्रांचीही सेवा करतील; मग त्याच्या देशाची वेळ येईल तेव्हा बहुत राष्ट्रे व थोर राजे त्याच्याकडून सेवा करवून घेतील.


मग यिर्मयाने दुसरा पट घेऊन नेरीयाचा पुत्र बारूख लेखक ह्याला दिला; तेव्हा यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याने जो ग्रंथ अग्नीत जाळून टाकला होता त्यातली सर्व वचने त्याने त्यावर यिर्मयाच्या सांगण्यावरून लिहिली, व त्यांत तशाच दुसर्‍या बहुत वचनांची भर घातली.


तेव्हा यिर्मयाने नेरीयाचा पुत्र बारूख ह्याला बोलावले, व परमेश्वराने यिर्मयाला जी वचने सांगितली होती ती सर्व त्याच्या तोंडून ऐकून बारुखाने त्या पटावर लिहिली.


मी खबार नदीच्या तीरी पकडून आणलेल्या लोकांत राहत होतो, तेव्हा तिसाव्या वर्षाच्या चौथ्या मासी पंचमीस असे झाले की आकाश दुभागून मला दिव्य दृष्टान्त दिसले.


त्याने दिव्य दृष्टान्ताच्या द्वारे मला इस्राएल देशात नेऊन एका अतिशय उंच पर्वतावर ठेवले; त्यावर दक्षिणेस नगराच्या आकारासारखे काही होते.


ह्या चौघां तरुणांना देवाने सर्व विद्या व ज्ञान ह्यांत निपुण व प्रवीण केले; दानीएल हा सर्व दृष्टान्त व स्वप्ने ह्यांचा उलगडा करण्यात तरबेज झाला.


नबुखद्नेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी स्वप्ने पडली, तेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली.


बेल्टशस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास राजाने म्हटले, “मी जे स्वप्न पाहिले ते व त्याचा अर्थ मला सांगण्यास तू समर्थ आहेस काय?”


मी पलंगावर पडलो असता माझ्या मनात दृष्टान्त घोळत होते, त्यांत मी पाहिले की एक जागल्या, पवित्र पुरुष, आकाशातून उतरला.


मी स्वप्न पाहिले त्याने मी भयभीत झालो; मी पलंगावर पडलो असता माझे विचार व माझ्या मनात घोळत असलेल्या कल्पना ह्यांनी मी चिंताक्रांत झालो.


बेलशस्सर राजाने आपल्या एक हजार सरदारांना मोठी मेजवानी केली; त्या हजारांसमक्ष तो द्राक्षारस प्याला.


हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहेस. हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाहीस;


त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याचा वध झाला.


तेव्हा मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तर आकाशातील मेघांवर आरूढ होऊन, मानवपुत्रासारखा कोणी आला; तो त्या पुराणपुरुषाकडे आला व त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले.


मग मी दानीएल तर असा झालो की, माझ्या ठायी माझा जीव घाबरा झाला; माझ्या डोक्यात घोळणार्‍या दृष्टान्तांमुळे मी चिंताक्रांत झालो.


ह्यानंतर मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तो पाहा, एक चौथे श्वापद विक्राळ, भयानक व अतिशय बळकट असे होते; त्याला मोठाले लोखंडी दात होते; ते सर्वकाही चावून त्याचा चुरा करी व उरलेले आपल्या पायांखाली तुडवी; ते अगोदरच्या सर्व श्वापदांहून भिन्न होते; आणि त्याला दहा शिंगे होती.


मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टान्त झाला होता, त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी मला पुन्हा दृष्टान्त झाला.


ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील.


प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे ह्यांना कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही.


मग परमेश्वराने मला उत्तर दिले की, “हा दृष्टान्त लिहून काढ, पाट्यांवर ठळक लिही; म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे.


परमेश्वर त्यांना म्हणाला, “माझे शब्द ऐका, तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टान्तात प्रकट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करत असतो.


धीराच्या व शास्त्रापासून मिळणार्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले.


प्रौढी मिरवणे मला भाग पडते; तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरणे ह्यांच्याकडे आता वळतो.


म्हणून जे तू पाहिले, जे आहे व ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव;


त्या सात मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो; इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणाली : “सात मेघगर्जनांनी काढलेले ‘शब्द गुप्त ठेव,’ ते लिहू नकोस.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan