Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 6:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 दानीएल त्या अध्यक्षांत व प्रांताधिकार्‍यांत श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्या ठायी उत्तम आत्मा वसत होता; त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 दानीएल त्या प्रशासक व प्रांताधिकाऱ्यांत श्रेष्ठ ठरला कारण त्याच्यामध्ये उत्तम आत्मा वसत होता. राजा त्यास सर्व राज्यावर नेमण्यासाठी योजना करत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 दानीएल हा अध्यक्ष व प्रांताधिकारी यांच्यापेक्षा त्याच्या विलक्षण गुणांमुळे सरस असल्यामुळे शासक म्हणून त्यालाच संपूर्ण साम्राज्यावर नेमावे अशी राजाची योजना होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 6:3
12 Iomraidhean Croise  

सांभाळा, ह्या गोष्टींसंबंधाने ढिलाई करू नका; राजाची हानी करणारा असा हा उपद्रव का वाढू द्यावा?”


तेव्हा मी आपला भाऊ हनानी व गढीचा अधिपती हनन्या ह्यांना यरुशलेमेचे अधिकारी नेमले; हा हनन्या इमानी असून इतर पुष्कळ लोकांहून देवाचे भय विशेष बाळगत असे.


मर्दखय यहूदी ह्याचा दर्जा अहश्वेरोश राजाच्या खालोखाल होता; यहूदी लोकांमध्ये तो फार थोर होता; त्याच्या बांधवसमुदायात त्याची मोठी मान्यता असे; तो आपल्या लोकांचे कल्याण करण्यास झटे व आपल्या सर्व लोकांचे कुशल कसे होईल ह्याकडे त्याचे लक्ष असे.


जो मितभाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते; ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो.


आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजांसमोर आहे; हलकट लोकांसमोर नाही.


मग माझ्या नजरेस आले की अंधकारापेक्षा प्रकाश जसा श्रेष्ठ तसे मूर्खतेपेक्षा ज्ञान श्रेष्ठ.


कारण उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा अर्थ सांगणे, कूट प्रश्‍न उलगडणे, कोडी उकलणे, ह्यासंबंधाने ज्याला राजाने बेल्टशस्सर असे नाव दिले होते तो दानीएल प्रवीण होता असे दिसून आले; तर आता दानिएलास बोलावून आणा म्हणजे तो अर्थ सांगेल.”


मी तुझ्याविषयी ऐकले आहे की देवांचा आत्मा तुझ्या ठायी आहे आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान ही तुझ्या ठायी दिसून आली आहेत.


राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की, “मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांना घेऊन या.” राजा त्या बाबेलच्या ज्ञान्यांस म्हणाला, “जो कोणी हा लेख वाचील व ह्याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील तिघा अधिपतींतला एक होईल.”


तुझ्या प्रार्थनांना आरंभ होताच आज्ञा झाली, ती तुला सांगण्यास मी आलो आहे; कारण तू परमप्रिय आहेस; तर ह्या गोष्टींचा विचार कर व हा दृष्टान्त समजून घे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan