Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्याच घटकेस मानवी हाताची बोटे प्रकट झाली व त्यांनी दीपवृक्षासमोर राजवाड्याच्या भिंतींच्या गिलाव्यावर काही लिहिले आणि हाताची बोटे लिहीत होती ती राज्याच्या दृष्टीस पडली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्या क्षणाला मानवी हाताची बोटे तिथे दिपस्तंभासमोर प्रगट झाली आणि त्यांनी राजवाड्यातील भिंतीच्या गिलाव्यावर असे काही लिहीले जे राजास वाचता येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 एकाएकी मानवी हाताची बोटे प्रकट झाली आणि राजवाड्यातील दिवठणीच्या समोरच्या भिंतीच्या गिलाव्यावर काहीतरी लिहू लागली. ती हाताची बोटे लिहित असतानाच राजाने ती पाहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 5:5
15 Iomraidhean Croise  

की दुर्जनांचा जयजयकार अल्पकालिक असतो; अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो.


पुष्कळदा वाग्दंड झाला असूनही जो आपली मान ताठ करतो, त्याचा अचानक चुराडा होतो, त्याचा काही उपाय चालत नाही


त्यांचा लौकिक बाबेलच्या राजाने ऐकला आहे, त्याचे हात गळाले आहेत; प्रसवणार्‍या स्त्रीप्रमाणे क्लेश आणि कळा त्याला लागल्या आहेत.


हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली की, “हे राजा, नबुखद्नेस्सरा, हे तुला विदित होवो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे.


त्याच घटकेस हे नबुखद्नेस्सराच्या प्रत्ययास आले; त्याला मनुष्यांतून घालवून दिले व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला; त्याचे शरीर आकाशातल्या दहिवराने भिजू लागले; येथवर की त्याचे केस गरुडाच्या पिसांप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्ष्यांच्या नखांसारखी झाली.


आता हा लेख वाचून त्याचा अर्थ मला सांगावा म्हणून हे ज्ञानी व मांत्रिक लोक माझ्यापुढे आणले, पण त्याचा अर्थ त्यांना सांगता येईना.


त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने. रुपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांपासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले.


तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला; त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले, आणि त्याचे गुडघे लटपटू लागले.


मग राजाचे सर्व ज्ञानी पुरुष वाड्यात आले; पण त्यांना तो लेख वाचता येईना व त्याचा अर्थ राजाला सांगता येईना.


आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan