Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 द्राक्षारसाचे सेवन करीत असता बेलशस्सराने हुकूम केला की, ‘माझा बाप नबुखद्नेस्सर ह्याने यरुशलेमेतील मंदिरातून जी सोन्यारुप्याची पात्रे आणली आहेत ती घेऊन या, म्हणजे मी, माझे सरदार, माझ्या पत्नी व उपपत्नी ह्यांना त्यांतून द्राक्षारस पिता येईल.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 बेलशस्सराने द्राक्षरस चाखल्यावर आज्ञा केली की, सोन्या चांदीची ती पात्रे घेवून या जी त्याचा बाप नबुखद्नेस्सराने यरूशलेमेच्या मंदिरातून आणली होती. ह्यासाठी की, राजा, त्याचे सरदार आणि त्याच्या पत्नी व उपपत्नी हयांना त्यातून द्राक्षरस पिता येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 बेलशस्सर द्राक्षारस पीत असताना, त्याने आज्ञा दिली की त्याचे पिता नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणावीत, जेणेकरून राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ शकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 5:2
23 Iomraidhean Croise  

दावीद त्याला म्हणाला, “भिऊ नकोस, तुझा बाप योनाथान ह्याच्यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन; तुझा बाप शौल ह्याची सर्व जमीन तुला परत देईन; आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावेस.”


मग त्याने परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्यात ठेवलेले सारे धन लुटून नेले; शलमोन राजाने जी सोन्याची पात्रे करून परमेश्वराच्या मंदिरात ठेवली होती ती सर्व फोडून त्यांचे त्याने तुकडे केले; तसे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते.


अग्निपात्रे, कटोरे वगैरे जेवढी सोन्याची होती त्यांचे सोने व जी चांदीची होती त्यांची चांदी गारद्यांच्या सरदाराने नेली.


तिच्यामागून त्याने अबशालोमाची कन्या माका बायको केली; तिच्या पोटी त्याला अबीया, अत्थय, जीजा व शलोमीथ ही मुले झाली.


आसा राजाने आपली आई माका हिला राजमातेच्या पदावरून दूर केले, कारण तिने अशेराप्रीत्यर्थ एक अमंगळ मूर्ती केली होती; तिने केलेली ती मूर्ती आसाने फोडूनतोडून किद्रोन ओहळाजवळ जाळून टाकली.


वर्षारंभी नबुखद्नेस्सराने सैन्य पाठवून तो व त्याच्याबरोबर परमेश्वराच्या मंदिरातली मोलवान पात्रे ही बाबेलास आणली आणि त्याचा भाऊ सिद्कीया ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांवर राजा केले.


देवाच्या मंदिरातील लहानमोठी सर्व पात्रे व निधी, आणि राजा व त्याचे सरदार ह्यांचे निधी ही सर्व तो बाबेलास घेऊन गेला.


देवाच्या मंदिरातली सोन्यारुप्याची पात्रे नबुखद्नेस्सराने यरुशलेमाच्या मंदिरातून काढून नेऊन बाबेलातील मंदिरात ठेवली होती ती कोरेश राजाने तेथील मंदिरातून बाहेर काढून शेशबस्सर नावाच्या पुरुषास अधिकारी नेमून त्याच्या हवाली केली;


सर्व राष्ट्रे त्याची सेवा करतील, त्याच्या पुत्रपौत्रांचीही सेवा करतील; मग त्याच्या देशाची वेळ येईल तेव्हा बहुत राष्ट्रे व थोर राजे त्याच्याकडून सेवा करवून घेतील.


परमेश्वर म्हणतो, खास्द्यांवर तलवार उपसली आहे; आणि ती बाबेलचे रहिवासी, तिचे सरदार व तिचे ज्ञानी ह्यांच्यावर उपसली आहे.


ह्यांखेरीज, पेले, अग्निपात्रे, वाटगे, बहुगुणी, समया, चमचे, कटोरे वगैरे जेवढी सोन्याची होती त्यांचे सोने व जी चांदीची होती त्यांची चांदी गारद्यांच्या सरदाराने नेली.


प्रभूने यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला त्याच्या हाती दिले; त्याप्रमाणेच देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली; त्याने ती शिनार देशात आपल्या दैवताच्या घरी नेली आणि आपल्या दैवताच्या भांडारात ठेवली.


पवित्र देवांचा आत्मा ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे; आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश, विवेक व देवांच्या ज्ञानासारखे ज्ञान ही त्याच्या ठायी दिसून आली; महाराज, आपला बाप नबुखद्नेस्सर राजा ह्यांनी त्याला ज्योतिषी, मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांचा अध्यक्ष नेमले होते;


तेव्हा दानिएलास राजापुढे आणले. राजा त्याला म्हणाला, “माझा बाप, जो राजा, त्याने यहूदातून पकडून आणलेल्या लोकांपैकी दानीएल तो तूच काय?


हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सर ह्याला राज्य, महत्त्व, वैभव व महिमा ही दिली.


तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास; त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत; तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस;


तेव्हा यरुशलेमेतील देवाच्या मंदिराच्या पवित्रस्थानातून आणलेली सोन्याची पात्रे ते घेऊन आले; राजा, त्याचे सरदार, त्याच्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली.


त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याचा वध झाला.


त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने. रुपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांपासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले.


त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;


Lean sinn:

Sanasan


Sanasan