Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 5:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 त्याने त्याला मोठेपणा दिला म्हणून सर्व लोक, सर्व राष्ट्रांचे व सर्व भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्याला भीत; वाटेल त्याला तो ठार मारी व वाटेल त्याला जिवंत राखी; वाटेल त्याला तो थोर करी व वाटेल त्याला तो नीच करी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 त्याने त्यास मोठेपणा दिल्यामुळे सर्व राष्ट्रांचे लोक, दास, भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्यास भित होते. त्यास वाटेल त्यास तो ठार करीत असे, किंवा जीवन देत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 कारण त्यांनी राजाला असे उच्च स्थान दिले की, सर्व राष्ट्रे आणि प्रत्येक भाषा बोलणारे त्यांच्यासमोर थरथर कापत आणि त्याला भीत असत. राजाला ज्याला ठार करावयाचे होते त्याला ठार करीत असत; ज्याला वाचवायचे होते त्याला वाचवित असत; ज्याला बढती द्यायची त्याला बढती देत असत; आणि ज्याला नम्र करावयाचे त्याला नम्र करीत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 5:19
22 Iomraidhean Croise  

त्याच्याशी त्याने गोड भाषण करून बाबेलात जे राजे त्याच्या बंदीत होते त्यांच्याहून त्याला उच्च आसन दिले.


राजाचा संताप मृत्युदूतांसारखा आहे; सुज्ञ मनुष्य त्याचे शमन करतो.


त्याला सोडून जाण्याची घाई करू नकोस; दुष्ट मसलतीत शिरू नकोस; कारण त्याला आवडेल ते तो करतो,


म्हणून मी त्याला एका बलिष्ठ राष्ट्राच्या स्वाधीन करीन; तो खातरीने त्याचा समाचार घेईल; त्याच्या दुष्टतेमुळे मी त्याचा त्याग केला आहे.


लष्कर जसजसे पुढे चाल करील तसतसे त्याचे मन उन्मत्त होईल; तो लाखो लोकांना चीत करील तरी तो यशस्वी होणार नाही.


त्याच्यावर चढाई करणारा आपल्या इच्छेस येईल तसे करील व त्याच्यासमोर कोणी टिकाव धरणार नाही; तो आपल्या हाती प्रत्यक्ष नाश घेऊन त्या वैभवी देशात उभा राहील.


आणखी एक प्रबळ राजा उत्पन्न होईल, तो आपली सत्ता फार गाजवील आणि आपल्या इच्छेस येईल तसे करील.


तो राजा मनास येईल तसे वर्तेल; तो उन्मत्त होईल; सर्व दैवतांहून तो स्वतःला श्रेष्ठ समजेल आणि देवाधिदेवाविरुद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल; कोपाची पूर्णता होईपर्यंत त्याची चलती राहील; जे नेमले आहे ते घडेलच.


ह्याकरता मी फर्मावतो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्राचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक, ह्यांपैकी जे कोणी शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे-तुकडे करण्यात येतील; त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील; कारण अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही.”


मग एका भाटाने मोठ्याने घोषणा केली की, “अहो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रांतील निरनिराळ्या भाषा बोलणार्‍या लोकांनो, तुम्हांला आज्ञा होत आहे की,


जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तत्क्षणीच धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील.”


हे शासन त्या जागल्यांच्या ठरावान्वये व पवित्र जनांच्या वचनानुसार झाले; ते अशासाठी की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे, व तो ते पाहिजे त्याला देतो आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यांपैकी पाहिजे त्याला नेमतो, हे सर्व जीवधार्‍यांना समजावे.’


मग बेल्टशस्सर हे नाव दिलेला दानीएल क्षणभर बुचकळ्यात पडला व विचारांनी त्याचे मन व्यग्र झाले. तेव्हा राजा त्याला म्हणाला, “बेल्टशस्सरा, ह्या स्वप्नासंबंधाने व त्याच्या अर्थासंबंधाने तू घाबरू नकोस.” तेव्हा बेल्टशस्सराने म्हटले, “माझे स्वामी, हे स्वप्न आपल्या द्वेष्ट्यांना व त्याचा अर्थ आपल्या वैर्‍यांना लागू पडो!


महाराज, तो वृक्ष आपणच आहात; आपण वाढून बलवान झाला आहात; आपली थोरवी वाढून गगनापर्यंत पोहचली आहे.


शिवाय त्याचा द्राक्षारस दगा देणारा आहे; तो अहंकारी मनुष्य आहे, तो घरी टिकत नाही, त्याने अधोलोकाप्रमाणे आपली लालसा वाढवली आहे. तो मृत्यूसारखा अतृप्त आहे, तो सर्व राष्ट्रांना आपणाजवळ जमा करतो, सर्व लोकांना आपल्यानजीक एकत्र करतो.”


येशूने उत्तर दिले, “आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता; म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे.”


प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकारी आहेत ते देवाने नेमलेले आहेत.


ते ‘नवे गीत गाऊन’ म्हणतात : “तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस; कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून 1आमच्या ‘देवासाठी’ विकत घेतले आहेत


Lean sinn:

Sanasan


Sanasan