Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तेव्हा दानिएलास राजापुढे आणले. राजा त्याला म्हणाला, “माझा बाप, जो राजा, त्याने यहूदातून पकडून आणलेल्या लोकांपैकी दानीएल तो तूच काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 नंतर दानीएलास राजासमोर आणले. “राजा त्यास म्हणाला तू दानीएल आहेस, यहूदातून पकडून आणलेल्या बंदीवानातील एक ज्यास माझ्या वडिलाने पकडले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तेव्हा दानीएलला राजासमोर आणण्यात आले आणि राजाने त्याला म्हटले, “दानीएल तो तूच आहेस काय, ज्याला माझे पिता राजा यांनी यहूदीयातून कैदी म्हणून आणला होता?

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 5:13
20 Iomraidhean Croise  

बंदिवासातून आलेल्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे केले. एज्रा याजक व पितृकुळांचे काही प्रमुख आपापल्या पितृकुळांप्रमाणे व नावांप्रमाणे आपली नावे नोंदवून निराळे झाले; आणि दहाव्या महिन्याच्या प्रतिपदेस ते ह्या बाबीची चौकशी करण्यास बसले.


मग त्याने यहूदा व यरुशलेम ह्यांत राहणार्‍या बंदिवासातून परत आलेल्या सर्व लोकांना जाहीर केले की, तुम्ही यरुशलेमेत एकत्र व्हा;


बंदिवासातून आलेले लोक इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ मंदिर बांधत आहेत असे यहूदा व बन्यामीन ह्यांच्या शत्रूंनी ऐकले,


तेव्हा इस्राएल लोक म्हणजे याजक, लेवी व बंदिवासातून परत आलेले लोक ह्यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहाने केली.


यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यरुशलेमेवर चढाई करून त्याला वेढा घातला.


प्रभूने यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला त्याच्या हाती दिले; त्याप्रमाणेच देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली; त्याने ती शिनार देशात आपल्या दैवताच्या घरी नेली आणि आपल्या दैवताच्या भांडारात ठेवली.


दानीएल हा कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत तेथे राहिला.


ह्या तरुण मंडळीत यहूदा वंशातले दानीएल, हनन्या, मीशाएल व अजर्‍या हे होते.


तेव्हा अर्योकाने दानिएलास त्वरेने राजाकडे नेऊन म्हटले, “महाराजांस स्वप्नाचा अर्थ सांगणारा असा एक पुरुष बंदिवान करून आणलेल्या यहूद्यांमध्ये मला आढळला आहे.”


मग राजाने दानिएलास थोर पदास चढवले, त्याला मोठमोठी इनामे दिली, त्याला सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि त्याला बाबेलच्या सर्व ज्ञान्यांच्या प्रमुखांचा अध्यक्ष केले.


पवित्र देवांचा आत्मा ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे; आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश, विवेक व देवांच्या ज्ञानासारखे ज्ञान ही त्याच्या ठायी दिसून आली; महाराज, आपला बाप नबुखद्नेस्सर राजा ह्यांनी त्याला ज्योतिषी, मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांचा अध्यक्ष नेमले होते;


मी तुझ्याविषयी ऐकले आहे की देवांचा आत्मा तुझ्या ठायी आहे आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान ही तुझ्या ठायी दिसून आली आहेत.


हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सर ह्याला राज्य, महत्त्व, वैभव व महिमा ही दिली.


द्राक्षारसाचे सेवन करीत असता बेलशस्सराने हुकूम केला की, ‘माझा बाप नबुखद्नेस्सर ह्याने यरुशलेमेतील मंदिरातून जी सोन्यारुप्याची पात्रे आणली आहेत ती घेऊन या, म्हणजे मी, माझे सरदार, माझ्या पत्नी व उपपत्नी ह्यांना त्यांतून द्राक्षारस पिता येईल.’


तेव्हा ते राजाला म्हणाले, “महाराज, पकडून आणलेल्या यहूद्यांपैकी तो दानीएल आपणाला व आपण सही केलेल्या द्वाहीला जुमानत नाही; तर तो नित्य तीनदा प्रार्थना करतो.”


मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टान्त झाला होता, त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी मला पुन्हा दृष्टान्त झाला.


मग मी दानीएल मूर्च्छित झालो व काही दिवस आजारी पडलो; त्यानंतर मी उठून राजाचे कामकाज करू लागलो. हा दृष्टान्त पाहून मी विस्मित झालो; पण तो कोणास कळला नाही.


ह्यानंतर येशू गालीलात फिरू लागला; कारण यहूदी त्याला जिवे मारायला पाहत होते, म्हणून त्याला यहूदीयात फिरावेसे वाटले नाही.


म्हणून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “जी कामे तू करतोस ती तुझ्या शिष्यांनीही पाहावीत म्हणून तू येथून निघून यहूदीयात जा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan