Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 4:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तेव्हा ज्योतिषी, मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ हे आत आल्यावर मी आपले स्वप्न त्यांच्यापुढे मांडले; पण त्यांनी त्याचा अर्थ मला सांगितला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तेव्हा जादूगार, भुतविद्या करणारे, खास्दी आणि ज्योतिषी हे मजकडे आले. मी त्यांना स्वप्न सांगितले पण त्याचा उलघडा त्यांना होईना.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जेव्हा जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी, दैवप्रश्न सांगणारे आले, तेव्हा मी त्यांना माझे स्वप्न सांगितले, पण ते मला त्याचा अर्थ सांगू शकले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 4:7
16 Iomraidhean Croise  

आणि त्या सात खुरटलेल्या कणसांनी ती सात चांगली कणसे गिळून टाकली. मी हे जोतिष्यांना सांगितले, पण ते मला उलगडून सांगणारा कोणी नव्हता.”


सकाळी फारोचे चित्त अस्वस्थ झाले, आणि त्याने मिसर देशातील अवघे ज्योतिषी व पंडित ह्यांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली, पण फारोला त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता.


मी एक निर्दय दुर्जन पाहिला, तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला;


खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञांना वेडे ठरवणारा, ज्ञानी लोकांना मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरवणारा मी आहे.


पाहा, अश्शूर हा लबानोनाचा एक गंधसरू असून त्याला सुंदर फांद्या फुटल्या, त्याची छाया गर्द झाली, तो उंच वाढून त्याचा शेंडा मेघमंडळास जाऊन भिडला.


अव्यंग, सुरूप, सर्व व्यवहारांत दक्ष, ज्ञानसंपन्न, विद्यापारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यांना खास्द्यांची विद्या व भाषा शिकवावी.


खास्द्यांनी राजास उत्तर केले, “महाराजांची ही गोष्ट सांगेल असा कोणी मनुष्य सार्‍या दुनियेत नाही; असली गोष्ट ज्योतिष्यांना, मांत्रिकांना किंवा खास्द्यांना कोणाही थोर व पराक्रमी राजाने आजपर्यंत विचारली नाही.


दानिएलाने राजाला उत्तर दिले की, “महाराजांनी जे रहस्य विचारले आहे ते ज्ञानी, मांत्रिक, ज्योतिषी व दैवज्ञ ह्यांना महाराजांना सांगता येणार नाही;


ते पुन्हा त्याला म्हणाले, “महाराजांनी आपले स्वप्न आपल्या ह्या दासांना सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”


ह्यावर कित्येक खास्द्यांनी राजाकडे जाऊन यहूद्यांवर दोषारोप केला.


हे स्वप्न मी नबुखद्नेस्सर राजाने पाहिले आहे; तर आता हे बेल्टशस्सरा, ह्याच्या अर्थाचा उलगडा कर, कारण माझ्या राज्यातील सर्व ज्ञानी पुरुषांना ह्याचा अर्थ मला सांगता आला नाही; पण तुला सांगता येईल, कारण पवित्र देवांचा आत्मा तुझ्या ठायी आहे.”


राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की, “मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांना घेऊन या.” राजा त्या बाबेलच्या ज्ञान्यांस म्हणाला, “जो कोणी हा लेख वाचील व ह्याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील तिघा अधिपतींतला एक होईल.”


मग राजाचे सर्व ज्ञानी पुरुष वाड्यात आले; पण त्यांना तो लेख वाचता येईना व त्याचा अर्थ राजाला सांगता येईना.


Lean sinn:

Sanasan


Sanasan