Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 4:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 त्या वेळी राजा म्हणाला, “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 “काय ही महान बाबेल नगरी, जी मी माझ्या राज निवासासाठी आणि माझ्या गौरवासाठी बांधली.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 मग राजा म्हणाला, “हे महान बाबेल नाही का, जे मी माझ्या प्रतापी सामर्थ्याने माझ्या वैभवाच्या गौरवासाठी शाही निवासस्थान म्हणून बांधले आहे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 4:30
33 Iomraidhean Croise  

शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत.


त्यांना त्याने बहुत दिवसपर्यंत म्हणजे एकशे ऐंशी दिवसपर्यंत आपल्या वैभवशाली राज्याची धनसंपत्ती आणि आपल्या श्रेष्ठ प्रतापाचे वैभव दाखवले.


हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस; तू मान व महिमा ह्यांनी मंडित आहेस.


मनुष्य प्रतिष्ठित असून त्याला अक्कल नसली, तर तो नश्वर पशूंसारखा आहे.


ते थट्टा करतात व दुष्टतेने जुलमाच्या गोष्टी बोलतात; ते मोठ्या डौलाने भाषण करतात.


गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.


गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय.


गर्व मनुष्याला खाली उतरवतो, पण ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो.


तेव्हा राष्ट्रांचा मुकुटमणी, खास्दी लोकांच्या ऐश्वर्याचे भूषण असा जो बाबेल त्याची, सदोम व गमोरा ह्यांचा देवाने सत्यानाश केला तेव्हाच्यासारखी स्थिती होईल.


त्याच्याबरोबर बोल; त्याला सांग : प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, हे मिसर देशाच्या फारो राजा, आपल्या नद्यांत पडून राहणार्‍या मोठ्या मगरा, तू जो म्हणतोस की, ‘नदी माझी आहे, मी ती स्वतःसाठी निर्माण केली आहे,’ त्या तुझ्याविरुद्ध मी आहे.


हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली की, “हे राजा, नबुखद्नेस्सरा, हे तुला विदित होवो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे.


शेवटी सोसाट्याचा वारा येऊन ते उडून जातील, स्वपराक्रम हाच ज्यांचा देव त्यांच्यावर दोष येईल.


कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल; व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”


मग ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘ह्यांना जागा दे’; तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील.


म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.


तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी3 नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, “‘पडली, मोठी बाबेल पडली, तिने आपल्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे.”’


मोठ्या नगरीचे तीन विभाग झाले; राष्ट्रांची नगरे कोसळली. तेव्हा देवाने आपला ‘तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला मोठ्या बाबेल नगरीला’ द्यावा, म्हणून त्याच्यासमोर तिचे स्मरण करण्यात आले.


तिच्या कपाळावर “मोठी बाबेल, कलावंतिणींची1 व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई,” हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते.


ते म्हणतील, “अरेरे! ‘बाबेल ही मोठी नगरी होती! बलाढ्य नगरी होती!’ एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.”


नंतर एका बलवान देवदूताने जात्याच्या एका मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला ‘आणि’ तो समुद्रात ‘भिरकावून म्हटले, “‘अशीच’ ती ‘मोठी’ नगरी ‘बाबेल’ झपाट्याने टाकली जाईल ‘व ह्यापुढे कधीही सापडणार नाही;”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan