Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 4:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 म्हणून महाराज, माझी मसलत आपण मान्य करावी; आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण करावे; अधर्म सोडून गरिबांवर दया करावी; अशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 म्हणून हे राजा माझी मसलत तुला मान्य असो, पाप सोडून योग्य ते कर, आपली दुष्टता सोडून जाचलेल्यावर दया कर. असे केल्यास तुझी समृध्दी जास्त दिवस राहील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 म्हणून महाराज, आनंदाने माझा सल्ला स्वीकारा: चांगले ते करून आपली पापे सोडा आणि वाईट सोडून पीडितांवर दया करा. मग तुमची समृद्धी होत राहील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 4:27
44 Iomraidhean Croise  

मग ते म्हणाले, “चला, आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरूज बांधू; आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही.”


“अहाब माझ्यापुढे कसा दीन झाला आहे हे तू पाहतोस ना? तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणीन.”


मी राजांसमोरसुद्धा तुझे निर्बंध सांगेन, मला संकोच वाटणार नाही.


गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.


दया व सत्य ह्यांच्या योगाने पापाचे क्षालन होते, आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने माणसे दुष्कर्मापासून दूर राहतात.


जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही; जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते.


कारण तो म्हणतो, “माझ्याच बाहुबलाने व माझ्या स्वत:च्या अकलेने हे मी केले आहे; मी चतुर आहे; मी राष्ट्रांच्या सीमा फिरवल्या आहेत व त्यांची भांडारे लुटली आहेत; बलाढ्य वीराप्रमाणे मी तक्तांवर बसलेल्यांना ओढून काढले आहे;


कारण तू आपल्या दुष्टतेवर भिस्त ठेवलीस; तू म्हणालीस, “कोणी मला पाहत नाही;” तुझे शहाणपण व तुझे ज्ञान ह्यांनी तुला बहकवले म्हणून तू आपल्या मनात म्हणालीस, “मीच आहे, माझ्यावेगळी कोणी नाही.”


अगे विलासिनी, जी तू निश्‍चिंत बसतेस व मनात म्हणतेस, “मीच आहे, माझ्यावेगळी कोणी नाही, मी विधवा होणार नाही, अपत्यहीनतेचा अनुभव मला घडणार नाही,” ती तू हे ऐक :


तुम्हांला पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे हितचिंतन करा व त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा; त्या नगराचे हित ते तुमचे हित.


यिर्मया म्हणाला, “ते तुला त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला विनवतो की, मी तुला जे सांगत आहे ती परमेश्वराची वाणी आहे असे समजून ती पाळ, म्हणजे तुझे बरे होईल व तुझा प्राण वाचेल.


कोणावर जुलूम करत नाही, कर्जदाराचे गहाण त्याला परत करतो, कोणाला लुटत नाही, भुकेल्यास अन्न देतो व उघड्यास वस्त्र लेववतो,


त्याच्याबरोबर बोल; त्याला सांग : प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, हे मिसर देशाच्या फारो राजा, आपल्या नद्यांत पडून राहणार्‍या मोठ्या मगरा, तू जो म्हणतोस की, ‘नदी माझी आहे, मी ती स्वतःसाठी निर्माण केली आहे,’ त्या तुझ्याविरुद्ध मी आहे.


मिसर देश ओसाड व वैराण होईल तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे; कारण तो म्हणाला, ‘नदी माझी आहे, मी ती निर्माण केली आहे’.


परमेश्वर तुमचा देव ह्याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्यामागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे; असे की जेणेकरून तुम्हांला त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल.


तुम्ही अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल हर्ष करता; तुम्ही म्हणता, “आम्ही आपल्या सामर्थ्याने सत्ता संपादली नाही काय?”


देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.”


शेवटी सोसाट्याचा वारा येऊन ते उडून जातील, स्वपराक्रम हाच ज्यांचा देव त्यांच्यावर दोष येईल.


हीच ती उल्लासी, निर्धास्त असलेली नगरी! ती आपल्या मनात म्हणत असे की मीच काय ती आहे, दुसरे कोणी नाही; ती कशी ओसाड, पशू बसण्याची जागा झाली आहे! तिच्याजवळून जाणारा प्रत्येक जण तिची छीथू करील व तिच्याकडे हातवारे करील.


ह्यास्तव पश्‍चात्तापास योग्य असे फळ द्या;


तर जे आत आहे त्याचा2 दानधर्म करा म्हणजे पाहा, सर्व तुम्हांला शुद्ध आहे.


तेव्हा नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा; संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.”


तर पहिल्याने दिमिष्कातील लोकांना व यरुशलेमेत, अवघ्या यहूदीया देशात व परराष्ट्रीय लोकांत मी उपदेश करत आलो की, पश्‍चात्ताप करा आणि पश्‍चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा.


तू ह्या आपल्या दुष्टतेचा पश्‍चात्ताप करून प्रभूजवळ विनंती कर म्हणजे तुझ्या अंत:करणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल.


म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो; देवाला तर आम्ही प्रकट झालोच आहोत; आणि तुमच्या सदसद्विवेकबुद्धीतही प्रकट झालो आहोत अशी आशा मी धरतो.


बंधुजनहो, तुम्हांला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले; तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा.


आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,


ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुंता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.


चोरी करणार्‍याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे.


सूर्य मावळत आहे तोच त्याचे तारण त्याला अवश्य परत कर म्हणजे तो आपले वस्त्र अंगावर घेऊन निजेल आणि तुझे अभीष्ट चिंतील; आणि तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुझे नीतिमत्त्व ठरेल.


पण शत्रूच्या खिजवण्याला मी भ्यालो; त्यांच्या विरोधकांनी ह्याचा भलताच अर्थ लावला असता; ते म्हणाले असते की, ‘आमच्याच हाताने पराक्रम केला आहे. ही काही परमेश्वराची कृती नव्हे.’


तसेच ‘हे धन माझ्याच सामर्थ्याने व बाहुबलाने मी मिळवले आहे’ असे तू मनात म्हणू नकोस;


मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा; कारण ‘प्रीती पापांची रास झाकून टाकते.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan