Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 4:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मग बेल्टशस्सर हे नाव दिलेला दानीएल क्षणभर बुचकळ्यात पडला व विचारांनी त्याचे मन व्यग्र झाले. तेव्हा राजा त्याला म्हणाला, “बेल्टशस्सरा, ह्या स्वप्नासंबंधाने व त्याच्या अर्थासंबंधाने तू घाबरू नकोस.” तेव्हा बेल्टशस्सराने म्हटले, “माझे स्वामी, हे स्वप्न आपल्या द्वेष्ट्यांना व त्याचा अर्थ आपल्या वैर्‍यांना लागू पडो!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 मग दानीएल, ज्यास बेल्टशस्सर नाव देण्यात आले होते तो काही क्षणासाठी गोंधळून गेला आणि त्याचे मन अस्वस्थ झाले. राजा म्हणाला, “बेल्टशस्सर हे स्वप्न किंवा त्याच्या अर्थाने तू घाबरू नकोस.” तेव्हा बोलटशस्सर म्हणाला, “माझ्या स्वामी हे स्वप्न तुझा द्वेष करणाऱ्यास आणि याचा अर्थ तुझा शत्रुस लागू पडो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 नंतर दानीएल (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जात), काही वेळेसाठी व्याकूळ झाला आणि त्याचे विचार त्याला भयभीत करू लागले. म्हणून राजा म्हणाला, “हे बेलटशास्सर, माझे स्वप्न किंवा त्याचा अर्थ यामुळे भयभीत होऊ नको.” तेव्हा बेलटशास्सराने (अर्थात् दानीएलाने) उत्तर दिले, “महाराज, जर हे स्वप्न तुमच्या शत्रूंवर आणि त्याचा अर्थ तुमच्या विरोधकांवर ओढवला असता, तर किती बरे झाले असते!

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 4:19
27 Iomraidhean Croise  

ती बापाला म्हणाली, “स्वामी, मला आपल्यापुढे उठून उभे राहवत नाही म्हणून रागावू नका, कारण मला स्त्रीधर्म प्राप्त झाला आहे.” अशा प्रकारे त्याने शोध केला; पण त्याला त्या गृहदेवता सापडल्या नाहीत.


तेव्हा त्याला सांग की, आपला सेवक याकोब ह्याची ही आहेत; ही त्याने आपला स्वामी एसाव ह्याला भेट म्हणून पाठवली आहेत; पाहा, तोही मागाहून येत आहे.”


योसेफ त्याला म्हणाला, “ह्याचा अर्थ असा : ते तीन फाटे म्हणजे तीन दिवस;


ओबद्या वाट चालत असता एलीया त्याला भेटला; त्याने त्याला ओळखले आणि दंडवत घालून त्याला म्हटले, “माझे स्वामी एलीया ते आपणच काय?”


तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर म आणि न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक.”


तुम्हांला पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे हितचिंतन करा व त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा; त्या नगराचे हित ते तुमचे हित.


माझी आतडी तुटतात हो तुटतात! माझ्या हृदयकोशास वेदना होत आहेत! माझे अंतर्याम अस्वस्थ झाले आहे! माझ्याने स्तब्ध राहवत नाही! कारण माझ्या जिवा, कर्ण्याचा नाद, रणशब्द तू ऐकला आहेस.


खोजांच्या सरदाराने त्यांना येणेप्रमाणे नावे दिली : दानिएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख व अजर्‍यास अबेद्नगो.


बेल्टशस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास राजाने म्हटले, “मी जे स्वप्न पाहिले ते व त्याचा अर्थ मला सांगण्यास तू समर्थ आहेस काय?”


महाराज, आपण राजाधिराज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज्य, पराक्रम, बल व वैभव ही दिली आहेत;


महाराज, ह्याचा अर्थ असा आहे आणि माझे स्वामीराजे, ह्याच्याविषयी परात्पर देवाचा ठराव हा आहे :


कारण उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा अर्थ सांगणे, कूट प्रश्‍न उलगडणे, कोडी उकलणे, ह्यासंबंधाने ज्याला राजाने बेल्टशस्सर असे नाव दिले होते तो दानीएल प्रवीण होता असे दिसून आले; तर आता दानिएलास बोलावून आणा म्हणजे तो अर्थ सांगेल.”


हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सर ह्याला राज्य, महत्त्व, वैभव व महिमा ही दिली.


त्याने त्याला मोठेपणा दिला म्हणून सर्व लोक, सर्व राष्ट्रांचे व सर्व भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्याला भीत; वाटेल त्याला तो ठार मारी व वाटेल त्याला जिवंत राखी; वाटेल त्याला तो थोर करी व वाटेल त्याला तो नीच करी.


मग मी दानीएल तर असा झालो की, माझ्या ठायी माझा जीव घाबरा झाला; माझ्या डोक्यात घोळणार्‍या दृष्टान्तांमुळे मी चिंताक्रांत झालो.


ह्या गोष्टींचे कथन येथे संपले. मी दानीएल ह्या कल्पनांनी व्याकूळ झालो, आणि माझी चर्या पालटली; तरी मी हे सर्व आपल्या मनात ठेवले.


मग मी दानीएल मूर्च्छित झालो व काही दिवस आजारी पडलो; त्यानंतर मी उठून राजाचे कामकाज करू लागलो. हा दृष्टान्त पाहून मी विस्मित झालो; पण तो कोणास कळला नाही.


पर्वत तुला पाहून विव्हळतात; जलप्रवाह सपाट्याने चालला आहे, डोह आपला शब्द उच्चारतो, आपले हात वर करतो.


हन्ना त्याला म्हणाली, “माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे; मी द्राक्षारसाचे किंवा मद्याचे सेवन केलेले नाही, मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते.


नंतर दावीदही उठून गुहेतून बाहेर पडला आणि त्याने मागून शौलाला हाक मारली, “माझे स्वामीराज!” शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा दाविदाने खाली लवून त्याला मुजरा केला.


दावीद अबनेरास म्हणाला, “तू मर्द आहेस ना? इस्राएलात तुझ्या तोडीचा कोण आहे? असे असून आपल्या स्वामीराजाचे तू का रक्षण केले नाहीस? एक जण तर तुझा स्वामीराजा ह्याचा घात करण्यास आला होता.


एली म्हणाला, “परमेश्वराने तुला जी गोष्ट सांगितली ती कोणती? माझ्यापासून ती लपवू नकोस; तुला जे काही तो बोलला आहे त्यातले काहीएक तू लपवून ठेवशील तर देव तुझे तसे किंबहुना अधिक शासन करो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan