Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 4:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 हे शासन त्या जागल्यांच्या ठरावान्वये व पवित्र जनांच्या वचनानुसार झाले; ते अशासाठी की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे, व तो ते पाहिजे त्याला देतो आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यांपैकी पाहिजे त्याला नेमतो, हे सर्व जीवधार्‍यांना समजावे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 हा निर्णय त्या देवदुताच्या घोषणेद्वारे आणि पवित्रजनांच्या विचाराने झाला आहे, यासाठी की मनुष्याच्या राज्यात परात्पर प्रभुत्व करतो, आणि ज्या कोणाला ते द्यायला तो इच्छितो त्यास तो ते देतो, आणि त्यावर मनुष्यातल्या सर्वांहून नीच अशा मनुष्यास तो स्थापतो, असे जिवंतांनी जाणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 “ ‘हा निर्णय दूतांद्वारे घोषित केला जातो, पवित्र लोक हा निर्णय जाहीर करतात, जेणेकरून जिवंतांना हे कळावे की जे परात्पर आहेत, ते पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च राज्यकर्ता आहेत आणि ज्याला ते इच्छितात, त्यांना ते देतात आणि त्यांच्यावर अगदी कनिष्ठाला नियुक्त करतात.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 4:17
30 Iomraidhean Croise  

(अहाबासारखा दुसरा कोणी झाला नाही; त्याची बायको ईजबेल हिने त्याला उत्तेजन दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यासाठी स्वतःला विकून टाकले होते;


संकटसमयी ह्या आहाज राजाने परमेश्वराचा अधिकच अपराध केला.


परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे; त्याचे राज्य सर्वांवर आहे.


मानवजातीत नीचत्वाला उच्च पद प्राप्त झाले म्हणजे दुर्जन चोहोकडे मिरवत चालतात.


परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रकट केले आहे; दुर्जनास त्याच्याच हातच्या पाशात त्याने गुंतवले आहे. (हिग्गायोन सेला)1


तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रकट व्हावे ह्यासाठीच मी तुला राखले आहे.


ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे.”1


तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” तेव्हा मी म्हणालो, “हा मी आहे! मला पाठव.”


त्यांना संतापाने शिक्षा करून मी त्यांचा भयंकर सूड घेईन; मी त्यांच्यावर सूड उगवीन तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”


ह्यास्तव मी परराष्ट्रांतले अधमाधम जन आणीन; ते त्यांची घरे हस्तगत करतील, मी जबरदस्तांचा ताठा मोडीन; त्यांची पवित्र स्थाने भ्रष्ट होतील.


मग त्याच्या जागी, त्यांनी राजपदाचा मान न दिलेला असा एक हलका मनुष्य उदयास येईल; पण तो लोक निर्धास्त असता येईल व आर्जवी भाषणे करून राज्य मिळवील.


तोच प्रसंग व समय बदलतो; तो राजांना स्थानापन्न अथवा स्थानभ्रष्ट करितो; तो ज्ञान्यांस ज्ञान देतो व बुद्धिमानांस बुद्धी देतो.


परात्पर देवाने जी चिन्हे व जे अद्भुत चमत्कार माझ्यासंबंधाने दाखवले आहेत ते विदित करावेत हे मला बरे वाटले आहे.


आपणाला मनुष्यांतून घालवून देतील; आपली वस्ती वनपशूंत होईल; आपणाला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल; आपण आकाशातील दहिवराने भिजाल; मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो हे ज्ञान आपणाला होईपर्यंत आपणावरून सात काळ जातील.


तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनांस जेर करील; तो नेमलेल्या सणांत व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहील; एक काळ, दोन काळ व अर्धा काळपर्यंत ते त्याच्या कबजात राहतील.


प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकारी आहेत ते देवाने नेमलेले आहेत.


आणि जगातील जे हीनदीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्याकरता निवडले की, जे आहे ते त्याने रद्द करावे,


देव, प्रभू येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत ह्यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की, मनात अढी न धरता ह्या आज्ञा पाळ, पक्षपाताने काही करू नकोस.


त्या चारही प्राण्यांना ‘प्रत्येकी सहा-सहा पंख असून ते प्राणी’ आतून ‘बाहेरून सर्वांगी, डोळ्यांनी भरलेले’ होते; आणि, “पवित्र, पवित्र, पवित्र, जो होता, ‘जो आहे’ व जो येणार तो ‘सर्वसमर्थ प्रभू देव,”’ असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाहीत.


तो कंगालांना धुळीतून उठवतो, दरिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात, आणि वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होते; कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यांवर त्याने दुनिया ठेवली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan