Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 4:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ह्याचे मानवहृदय जाऊन ह्याला पशुहृदय प्राप्त होवो व सात काळ त्याच्यावरून जावोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 त्याचे मानवी हृदय जावून त्यास प्राण्याचे हृदय प्राप्त होवो, तो पर्यंत सात वर्षे होऊन जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 सात वर्षापर्यंत, त्याचे माणसाचे मन बदलले जावो आणि त्याला पशूचे मन दिले जावो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 4:16
13 Iomraidhean Croise  

राजाने कूशीला विचारले, “तो तरुण अबशालोम सुखरूप आहे ना?” कूशी म्हणाला, “माझ्या स्वामीराजांचे शत्रू व जे कोणी आपली हानी करायला उठतील त्यांचे त्या तरुणासारखे होवो!”


ह्या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून माझ्याकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर.”


तेव्हा उत्तरेचा राजा पुन्हा येईल, तो आपल्याबरोबर पूर्वीपेक्षा मोठे लष्कर घेऊन येईल; तो काही वर्षांचा काळ संपल्यावर मोठे सैन्य व बहुत धन घेऊन येईल.


तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष नदीच्या पाण्यावर होता त्याने आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर करून, जो सदाजीवी त्याची शपथ वाहून म्हटल्याचे मी ऐकले, “एक समय, दोन समय व अर्धा समय एवढा अवधी आहे; पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे संपेल तेव्हा ह्या सर्व गोष्टी पूर्ण होतील.”


आणि महाराजांनी असे पाहिले की, एक जागल्या, पवित्र पुरुष, आकाशातून उतरून म्हणाला, हा वृक्ष तोडून ह्याचा नाश करा; तथापि ह्याचे बुंध जमिनीत राहू द्या; ह्याला लोखंड व पितळ ह्यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या; ह्याला आकाशातल्या दहिवराने भिजू द्या; ह्याला वनपशूंबरोबर वाटा मिळो, ह्याच्यावरून सात काळ जावोत तोवर असे होवो.


आपणाला मनुष्यांतून घालवून देतील; आपली वस्ती वनपशूंत होईल; आपणाला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल; आपण आकाशातील दहिवराने भिजाल; मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो हे ज्ञान आपणाला होईपर्यंत आपणावरून सात काळ जातील.


तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनांस जेर करील; तो नेमलेल्या सणांत व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहील; एक काळ, दोन काळ व अर्धा काळपर्यंत ते त्याच्या कबजात राहतील.


ह्या गोष्टींचे कथन येथे संपले. मी दानीएल ह्या कल्पनांनी व्याकूळ झालो, आणि माझी चर्या पालटली; तरी मी हे सर्व आपल्या मनात ठेवले.


ती नाहीशी होतील; परंतु तू निरंतर आहेस; ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील;


त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले होते; तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक ‘काळ, दोन काळ व अर्धकाळ’ तिचे पोषण व्हायचे होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan