Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 4:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्याला सुंदर पाने होती, त्यावर फळे विपुल असून सर्वांना खायला पुरेशी होती. वनपशू त्याच्या आश्रयाने राहत, अंतराळातील पक्षी त्याच्या शाखांमध्ये वस्ती करीत व त्या वृक्षावर सर्व मनुष्यांचे पोषण होत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्याची पाने सुंदर होती, त्यास भरपूर फळे असून ती सर्वांना खायला पुरेशी होती. वनपशु त्याच्या सावलीत आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यामध्ये राहत. तो वृक्ष सर्व जिवितांचे पोषण करीत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 त्याची पाने हिरवीगार होती, त्याला फळे भरपूर होती आणि त्यामध्ये प्रत्येकासाठी भोजन होते. त्याच्या खाली जंगली पशू विसावले होते, आणि त्याच्या फांद्यांमध्ये पक्षी राहत असत; त्यांनी आपली घरटी बांधली. त्यातून प्रत्येक प्राण्याला खायला मिळत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 4:12
13 Iomraidhean Croise  

तो पृथ्वीवरील लोकनायकांची बुद्धी हरण करतो, त्यांना मार्गरहित वैराण प्रदेशात भटकायला लावतो.


वृक्षांची काहीतरी आशा असते; तो तोडला तरी पुन्हा फुटतो; त्याला धुमारा फुटायचा राहत नाही.


तरी पाण्याच्या वासाने ते पुन्हा फुटते, नव्या रोपाप्रमाणे त्याला फांद्या येतात;


परमेश्वराचे अभिषिक्त जे आम्ही त्या आमच्या नाकपुड्यांचा श्वास, त्यांच्या गर्तेत अडकला; त्यांच्यासंबंधाने आम्हांला वाटले होते की त्याच्या छायेखाली आम्ही राष्ट्रांमध्ये जीवित कंठू.


मी इस्राएलाच्या उंच पर्वतावर ती लावीन; तिला फांद्या फुटतील, फळे येतील, तिचा उत्तम गंधसरू होईल; म्हणजे मग त्याच्याखाली सर्व पक्षिकुळे राहतील; त्याच्या शाखांच्या छायेत ती वस्ती करतील.


राष्ट्रांपैकी त्याच्या छायेला बसणारे त्याचे साहाय्यकर्ते तेही त्याच्यासहित तलवारीने ठार केलेल्यांमध्ये अधोलोकी गेले.


तो मोठ्याने पुकारून म्हणाला, ‘हा वृक्ष तोडून टाका, ह्याच्या फांद्या छेदा, ह्याची पाने झाडून टाका व ह्याची फळे विखरा; ह्याच्याखाली राहत असलेले पशू निघून जावोत व पक्षी ह्याच्या शाखांतून उडून जावोत.


तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे; तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते, की ‘आकाशातील पाखरे’ येऊन ‘त्याच्या फांद्यांत वस्ती करतात.”’


आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे.


तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की ‘आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते.”


ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात पेरला, मग तो वाढून त्याचे झाड झाले; आणि आकाशातील पाखरे त्याच्या फांद्यांत राहू लागली.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan