त्या वेळेस शिवान महिन्याच्या म्हणजे तिसर्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावण्यात आले आणि मर्दखयाच्या सांगण्याप्रमाणे इस्राएलाच्या अधिपतींना आणि हिंदुस्तानापासून कूश देशापर्यंतच्या एकशे सत्तावीस परगण्यांचे अधिपती व सरदार ह्यांना प्रत्येक प्रांताच्या लिपीत व निरनिराळ्या लोकांच्या भाषांत आणि यहूद्यांना त्यांच्या लिपीत व भाषेत खलिते पाठवण्यात आले.