Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 3:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 ह्याकरता मी फर्मावतो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्राचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक, ह्यांपैकी जे कोणी शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे-तुकडे करण्यात येतील; त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील; कारण अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 त्यामुळे मी ठराव करतो की, कुणीही लोक, कुठल्याही देशाचे, कोणतीही भाषा बोलणारे जर शद्रख, मेशख, अबेदनगो, यांच्या देवाच्या विरोधात बोलतील तर त्यांचे तुकडे करण्यात येतील, आणि त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. कारण अशा प्रकारे सोडविणारा दुसरा कोणता देव नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 म्हणून मी असे फर्मान काढतो की शद्रख, मेशख आणि अबेदनगोच्या परमेश्वराविरुद्ध कोणतेही राष्ट्र किंवा भाषा बोलणारे काहीही बोलतील तर त्यांचे तुकडे तुकडे करावेत आणि त्यांच्या घरादाराचेही उकिरडे करण्यात यावे. कारण परमेश्वर जसे सोडवितात, तसे दुसर्‍या कोणत्याही दैवताला करता येणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 3:29
17 Iomraidhean Croise  

त्यांनी बआलाच्या मूर्तीस्तंभाचा भंग केला, आणि त्याचे देऊळ मोडून त्याचे शौचकूप केले; ते आजवर आहे.


मी आणखी असाही हुकूम करतो की जो कोणी ह्या आज्ञेत कमीजास्त करील त्याच्या घराचे बहाल (लाकूड) काढून त्यावर त्या माणसास उचलून टांगावे आणि ह्या अपराधाबद्दल त्याच्या घराचा उकिरडा करावा.


तारण परमेश्वराच्या हातून होते; तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. (सेला)


कारण मनुष्याचा क्रोध तुझ्या स्तुतीचे साधन असा होतो; अवशिष्ट क्रोधाने तू आपली कंबर बांधतोस.


तेव्हा राजाने त्यांच्याशी संभाषण केले; त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्या, मीशाएल व अजर्‍या ह्यांच्या तोडीचे दुसरे कोणी दिसून आले नाहीत; म्हणून ते राजाच्या हुजुरास राहू लागले.


खोजांच्या सरदाराने त्यांना येणेप्रमाणे नावे दिली : दानिएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख व अजर्‍यास अबेद्नगो.


ह्यावर दानिएलाने आपल्या घरी जाऊन आपले सोबती हनन्या, मीशाएल व अजर्‍या ह्यांना ही हकीगत कळवली.


राजाने दानिएलास म्हटले, “तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्ये प्रकट करणारा देव आहे.”


राजाने दानिएलाच्या विनंतीवरून शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना बाबेल परगण्याचा कारभार सांगितला; पण दानीएल राजदरबारी असे.


राजाने खास्द्यांना म्हटले की, “माझा ठराव होऊन चुकला आहे की माझे स्वप्न व त्याचा अर्थ मला तुम्ही कळवला नाही, तर तुमचे तुकडे-तुकडे करून तुमची घरे उकिरडे करावेत.


पण आपण बाबेल परगण्यावर नेमलेले शद्रख, मेशख, अबेद्नगो ह्या नावांचे कोणी यहूदी आहेत त्यांनी, महाराज, आपली पर्वा केली नाही; ते आपल्या देवांची उपासना करीत नाहीत आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करीत नाहीत.”


आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे; नाही घातले तर तुम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल; माझ्या हातांतून तुम्हांला सोडवील असा कोणता देव आहे?”


ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे; महाराज, तो आम्हांला आपल्या हातातून सोडवील.


तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पण केले; त्यांना त्यांच्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सोडवले आहे; त्याचा धन्यवाद असो!


हा दानीएल दारयावेशाच्या कारकिर्दीत व कोरेश पारसी ह्याच्या कारकिर्दीत उत्कर्षास पोहचला.


त्यांचा दुर्ग आपल्या दुर्गासारखा नाही, हे आपले शत्रूही जाणून आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan