Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 3:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 आणि राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार व राजमंत्री जे तेथे जमले होते त्यांनी ह्या पुरुषांना पाहिले तेव्हा त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता, त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता, त्यांच्या पायमोजांना काही झाले नव्हते आणि अग्नीचा गंधही त्यांना लागला नव्हता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 तेथे जमलेले प्रांताधिकारी, प्रशासक, प्रादेशिक प्रशासक, स्थानिक प्रशासक, इतर प्रशासक आणि राजाचे सल्लागार ह्यांनी त्यास पाहिले. त्यांच्या शरीरावर अग्नीच्या जखमा नव्हत्या त्याचा एकही केस होरपळला नाही. त्यांना अग्नीचा वासही लागला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 मग राजपुत्र, राज्यपाल, सेनानायक, सल्लागार इत्यादी सर्व त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांच्या शरीराला विस्तवाची झळ लागली नाही, अथवा त्यांच्या डोक्याचा एक केससुद्धा होरपळला नव्हता; त्यांचे कपडे काळवंडले नव्हते आणि त्याच्या अंगाला धुराचा वासही येत नव्हता, असे सर्वांनी पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 3:27
17 Iomraidhean Croise  

त्याने तेथे जाऊन पाहिले तेव्हा त्याचे प्रेत वाटेवर पडले आहे आणि त्याच्याजवळ गाढव व सिंह उभे आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले; सिंहाने त्याचे प्रेत खाऊन टाकले नव्हते आणि त्या गाढवास फाडून टाकले नव्हते.


आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हांला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे जाणतील की तूच काय तो परमेश्वर देव आहेस.”


म्हणजे तू, केवळ तूच, परमेश्वर3 ह्या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळू दे.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही.


तेव्हा त्या पुरुषांना त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रांसहित बांधून धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकले.


तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की, “दानिएलास गुहेतून बाहेर काढा.” त्याला गुहेतून बाहेर काढले तेव्हा त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरवसा होता.


राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार ह्यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी, व अशी सक्त द्वाही फिरवली जावी की, हे राजा, ‘तीस दिवसपर्यंत आपल्याशिवाय कोणत्याही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे.’


तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील मोजलेले आहेत.


ह्या गोष्टी राजे अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत; त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो. ह्यांतले त्यांच्यापासून काही गुप्त नाही अशी माझी खातरी आहे; कारण हे कोनाकोपर्‍यात घडलेले नाही.


म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, अन्न खा; त्याच्याने तुमचा निभाव लागेल; कारण तुमच्यापैकी कोणाच्या डोक्याच्या केसाचादेखील नाश होणार नाही.”


अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan