Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 3:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 मग नबुखद्नेस्सर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, “अहो शद्रख, मेशख व अबेद्नगो, परात्पर देवाचे सेवकहो, अग्नीतून बाहेर या.” तेव्हा शद्रख, मेशख व अबेद्नगो अग्नीतून बाहेर आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 तेव्हा नबुखद्नेस्सराने धगधगत्या भट्टीच्या दाराजवळ येऊन त्यांना हाक मारली “शद्रख, मेशख, अबेदनगो, सर्वोच्च देवाच्या दासांनो बाहेर या.” येथे या, नंतर शद्रख, मेशख, अबेदनगो अग्नीतून बाहेर आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 नबुखद्नेस्सर त्या धगधगत्या भट्टीच्या दाराजवळ गेला आणि मोठ्याने हाक मारून म्हणाला, “परमोच्च परमेश्वराचे सेवक शद्रख, मेशख आणि अबेदनगो, बाहेर या! इकडे या!” तेव्हा शद्रख, मेशख आणि अबेदनगो अग्नीतून बाहेर आले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 3:26
22 Iomraidhean Croise  

आणि शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षारस घेऊन त्याला सामोरा आला; हा परात्पर देवाचा याजक होता.


कारण, ज्यांना तू मिसर देशातून, लोखंडाच्या भट्टीतून काढले तेच हे तुझे लोक, तुझे वतन होत;


त्यांनी आम्हांला हे उत्तर दिले : ‘आम्ही स्वर्गाच्या व पृथ्वीच्या देवाचे दास आहोत; जे मंदिर बहुत वर्षांमागे इस्राएलाच्या एका मोठ्या राजाने बांधून पुरे केले होते ते आम्ही बांधत आहोत.


तू मनुष्यांना आमच्या डोक्यांवरून स्वारी करायला लावले; आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो, तरी तू आम्हांला बाहेर काढून समृद्ध स्थळी आणलेस.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, सीयोनेत पायाचा दगड बसवणारा मी आहे; मी पारखलेला दगड आहे; ती पायाला योग्य अशी मजबूत व मोलवान कोनशिला आहे; ‘विश्वास ठेवणार्‍याची त्रेधा उडणार नाही.’


तुम्हांला घाईघाईने निघावे लागणार नाही, पळ काढावा लागणार नाही; कारण परमेश्वर तुमचा पुढारी आहे; इस्राएलाचा देव तुमचा पाठीराखा आहे.


ज्या दिवशी मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून, लोखंडी भट्टीतून बाहेर काढले त्या दिवशी हा करार मी त्यांना आज्ञापिला व म्हटले, माझी वाणी ऐका व माझ्या आज्ञेप्रमाणे सगळी वचने पाळा, म्हणजे तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन;


राजाने दानिएलास म्हटले, “तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्ये प्रकट करणारा देव आहे.”


ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे; महाराज, तो आम्हांला आपल्या हातातून सोडवील.


परात्पर देवाने जी चिन्हे व जे अद्भुत चमत्कार माझ्यासंबंधाने दाखवले आहेत ते विदित करावेत हे मला बरे वाटले आहे.


तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, “हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय?”


दानीएल राजाला म्हणाला, “महाराज, चिरायू असा.


तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनांस जेर करील; तो नेमलेल्या सणांत व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहील; एक काळ, दोन काळ व अर्धा काळपर्यंत ते त्याच्या कबजात राहतील.


ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत; हे तुम्हांला तारणाचा मार्ग कळवतात.”


परंतु पौल त्यांना म्हणाला, “आम्ही रोमी माणसे असता अपराधी ठरवल्यावाचून त्यांनी आम्हांला उघडपणे फटके मारून बंदिशाळेत टाकले आणि आता ते आम्हांला गुप्तपणे घालवतात काय? हे चालणार नाही; तर त्यांनी स्वतः येऊन आम्हांला बाहेर काढावे.”


कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला,


मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.


तुम्ही आज आहात त्याप्रमाणे परमेश्वराची खास1 प्रजा व्हावे म्हणून त्याने तुम्हांला लोखंडी भट्टीतून, म्हणजे मिसर देशातून बाहेर काढले आहे.


परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले, आणि सर्व इस्राएल कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देनेपलीकडे निघून गेले.


मोशेने यहोशवाला जे आज्ञापिले होते तेच लोकांना सांगण्याची आज्ञा परमेश्वराने यहोशवाला केली; त्याप्रमाणे करण्याचे संपेपर्यंत कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी उभे राहिले. मग लोक लवकर लवकर पार उतरून गेले.


इतक्यात ‘राजासनापासून’ वाणी झाली; ती म्हणाली, “अहो आमच्या देवाची ‘भीती बाळगणार्‍या सर्व लहानथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan