Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 3:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तो म्हणाला, पाहा! चार इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते; त्यांना काहीएक इजा पोहचली नाही; चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तो म्हणाला, मला असे दिसते की, चार माणसे अग्नीत मोकळे फिरत आहेत, त्यांना काही एक दुखापत झालेली नाही, चौथ्याचे तेज हे जणू देवपुत्रासारखे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 तो म्हणाला, “इकडे पाहा! मी चार पुरुष अग्नीत फिरत असलेले पाहत आहे आणि त्यांचे बंध सुटलेले आहेत आणि त्यांना कोणतीच हानी झालेली नाही, आणि त्यातील चौथा तर देवपुत्रासारखा दिसत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 3:25
20 Iomraidhean Croise  

एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले, व त्यांच्यामध्ये सैतानही आला.


त्या समयी प्रभातनक्षत्रांनी मिळून गायन केले. व सर्व देवकुमारांनी जयजयकार केला.


तो तुला सहा संकटांतून सोडवील; सातांनी तुला काही अपाय होणार नाही.


परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणार्‍यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो.


आकाशात चढून कोण उतरला आहे? वायू आपल्या ओंजळीत कोणी धरून ठेवला आहे? जलाशय वस्त्रात कोणी बांधून ठेवला आहे? पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापल्या आहेत? त्याचे नाव काय? त्याच्या पुत्राचे नाव काय? तुला ठाऊक असल्यास सांग.


तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही.


ते तुझ्याबरोबर सामना करतील पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


त्यांना तू भिऊ नकोस; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


मी तुला दुष्टांच्या हातून सोडवीन, तुला बलात्का-र्‍यांच्या तावडीतून मुक्त करीन.”


ते कसेही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही.”


नंतर नबुखद्नेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला; तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला, “आपण अग्नीत तिघा जणांना बांधून टाकले ना?” त्यांनी राजाला उत्तर केले, “होय महाराज, खरे आहे.”


तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पण केले; त्यांना त्यांच्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सोडवले आहे; त्याचा धन्यवाद असो!


तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की, “दानिएलास गुहेतून बाहेर काढा.” त्याला गुहेतून बाहेर काढले तेव्हा त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरवसा होता.


सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही; त्यांनी दुखणाइतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.”


देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.


त्याने तर ते जिवाणू विस्तवात झटकून टाकले आणि त्याला काही इजा झाली नाही.


व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्‍चित ठरला.


तुम्ही चांगल्याची आस्था बाळगणारे असाल तर तुमचे वाईट करणारा कोण?


Lean sinn:

Sanasan


Sanasan