Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 3:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 नंतर नबुखद्नेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला; तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला, “आपण अग्नीत तिघा जणांना बांधून टाकले ना?” त्यांनी राजाला उत्तर केले, “होय महाराज, खरे आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 नंतर नबुखद्नेस्सर चकीत होऊन त्वरीत उभा राहिला त्याने आपल्या सल्लागारास विचारले, “आपण त्या तिघांना बांधून भट्टीत टाकले ना?” त्यांनी उत्तर दिले, निश्चित राजे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 नबुखद्नेस्सर राजा चकित होऊन ताडकन उभा राहिला व आपल्या मंत्र्यांना विचारले, “आपण तीन माणसांना बांधून भट्टीत टाकले होते ना?” ते म्हणाले, “होय, निश्चित महाराज.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 3:24
18 Iomraidhean Croise  

अहाबाच्या घराण्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; त्याच्या बापाच्या मृत्यूनंतर त्या घराण्यातील लोकांनी त्याला असा सल्ला दिला की त्यायोगे त्याचा नाश झाला.


ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे; महाराज, तो आम्हांला आपल्या हातातून सोडवील.


शद्रख, मेशख व अबेद्नगो हे तीन पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले.


तो म्हणाला, पाहा! चार इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते; त्यांना काहीएक इजा पोहचली नाही; चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे.


महाराज, तो वृक्ष आपणच आहात; आपण वाढून बलवान झाला आहात; आपली थोरवी वाढून गगनापर्यंत पोहचली आहे.


म्हणून महाराज, माझी मसलत आपण मान्य करावी; आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण करावे; अधर्म सोडून गरिबांवर दया करावी; अशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील.”


हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सर ह्याला राज्य, महत्त्व, वैभव व महिमा ही दिली.


तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला; त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले, आणि त्याचे गुडघे लटपटू लागले.


माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काहीएक उपद्रव केला नाही; कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो; व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.”


राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार ह्यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी, व अशी सक्त द्वाही फिरवली जावी की, हे राजा, ‘तीस दिवसपर्यंत आपल्याशिवाय कोणत्याही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे.’


तो दरवाजाची दिंडी ठोकत असता रुदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली.


तेव्हा अहो राजे, वाटेवर दोन प्रहरी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्या व माझ्याबरोबर चालणार्‍या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला.


अहो राजे अग्रिप्पा, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? विश्वास आहे, हे मला ठाऊक आहे.”


तेव्हा तो थरथर कापत व आश्‍चर्यचकित होऊन म्हणाला “प्रभो, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” प्रभू म्हणाला,] “तर ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल.”


दावीद त्या पलिष्ट्याशी सामना करायला गेला हे पाहून शौलाने आपला सेनापती अबनेर ह्याला विचारले, “अबनेरा, हा तरुण पुरुष कोणाचा पुत्र आहे?” अबनेर म्हणाला, “महाराज, आपल्या जीविताची शपथ, मला ठाऊक नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan