Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 3:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली होती; म्हणून ज्या पुरुषांनी शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना तिच्यावर नेले ते ज्वालांनी भाजून मेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 राजाची आज्ञा सक्त असल्याने ती भट्टी फारच तप्त केलेली होती. शद्रख, मेशख, अबेदनगो यांना ज्यांनी भट्टीत टाकले ते सैनिक तिच्या ज्वालेने मरण पावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 राजाची आज्ञा कडक होती आणि भट्टी अतिशय तापली होती यामुळे ज्या सैनिकांनी शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांना भट्टीत टाकण्यासाठी उचलले होते, त्यांनाच अग्नीच्या ज्वालांनी ठार केले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 3:22
10 Iomraidhean Croise  

त्याने तेथे जाऊन पाहिले तेव्हा त्याचे प्रेत वाटेवर पडले आहे आणि त्याच्याजवळ गाढव व सिंह उभे आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले; सिंहाने त्याचे प्रेत खाऊन टाकले नव्हते आणि त्या गाढवास फाडून टाकले नव्हते.


इस्राएल लोकांनी देशातून धांदलीने निघून जावे म्हणून मिसरी लोकांनी त्यांच्यामागे तगादा लावला; ते म्हणाले, “आम्ही सगळे मेलोच आहोत.”


नीतिमान संकटांतून मुक्त होतो, आणि त्याच्या जागी दुर्जन सापडतो.


नीतिमानाची खंडणी दुर्जन, आणि सरळांचा मोबदला विश्वासघातकी असतो.


खोजांच्या सरदाराने त्यांना येणेप्रमाणे नावे दिली : दानिएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख व अजर्‍यास अबेद्नगो.


त्याने राजाचा सरदार अर्योक ह्याला म्हटले, “अशी निकडीची राजाज्ञा का?” तेव्हा अर्योकाने दानिएलास ती हकीगत सांगितली.


तेव्हा ज्या माणसांनी दानिएलावर आरोप आणला होता त्यांना राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना व त्यांच्या बायकामुलांना सिंहांच्या गुहेत टाकले; तेव्हा ते सिंहांच्या तडाक्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला.


मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला.


हेरोदाने त्याचा शोध केला असताही शोध लागला नाही; म्हणून त्याने पहारेकर्‍यांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला. मग तो यहूदीयाहून कैसरीयात येऊन राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan