Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 3:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 हे ऐकून नबुखद्नेस्सर संतापला; शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्यासंबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की, ‘भट्टी नेहमीपेक्षा सातपट तप्त करा.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 नबुखद्नेस्सर रागाने संतप्त झाला, त्याची शद्रख, मेशख, अबेदनगो विरूद्ध त्याची मुद्रा पालटली. त्याने आज्ञा केली की, भट्टी नेहमीपेक्षा सातपटीने तप्त करण्यात यावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तेव्हा नबुखद्नेस्सर हा शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांच्यावर रागाने संतप्त झाला आणि त्याची त्यांच्याबद्दलीची भावना बदलली. नेहमीपेक्षा भट्टी सातपट तापवावी असा त्याने हुकूम सोडला,

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 3:19
26 Iomraidhean Croise  

लाबान पूर्वीप्रमाणे आपल्यावर प्रसन्न नाही असे याकोबाने ताडले.


मर्दखय आपणासमोर नमून मुजरा करीत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याला फार क्रोध आला.


तेव्हा राजा क्रोधायमान होऊन भोजनावरून उठला व राजमंदिराच्या बागेत गेला; तेव्हा ‘मला प्राणदान द्या’ अशी विनवणी करीत हामान एस्तेर राणीपुढे उभा राहिला; कारण राजाने आपले वाईट करण्याचे ठरवले आहे हे त्याला समजून चुकले.


कारण मनुष्याचा क्रोध तुझ्या स्तुतीचे साधन असा होतो; अवशिष्ट क्रोधाने तू आपली कंबर बांधतोस.


राजाचा संताप मृत्युदूतांसारखा आहे; सुज्ञ मनुष्य त्याचे शमन करतो.


गर्विष्ठ व चढेल मनुष्याला ‘उद्दाम’ म्हणतात, तो गर्वाच्या ताठ्याने वागतो.


ज्या पीडा करणार्‍यांनी तुझ्या जिवाला म्हटले, खाली वाक म्हणजे आम्ही तुझ्यावरून चालून जाऊ, आणि तुझ्यावरून ज्या चालणार्‍यांसाठी तू आपली पाठ, भूमी व रस्ता अशी केली, त्यांच्या हाती मी तो प्याला देईन.”


हे ऐकून राजा क्रोधाने संतप्त झाला आणि ‘बाबेलच्या सर्व ज्ञान्यांचा वध करावा’ अशी त्याने आज्ञा केली.


हे ऐकून नबुखद्नेस्सराने क्रोधाने संतप्त होऊन शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे आणले.


मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषांना आज्ञा केली की, ‘शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्या मुसक्या बांधून त्यांना त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाका.’


तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला; त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले, आणि त्याचे गुडघे लटपटू लागले.


तेव्हा ज्या माणसांनी दानिएलावर आरोप आणला होता त्यांना राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना व त्यांच्या बायकामुलांना सिंहांच्या गुहेत टाकले; तेव्हा ते सिंहांच्या तडाक्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला.


इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हांला सातपट शिक्षा करीन,


तरीही माझ्याविरुद्ध तुम्ही वागलात व माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर सातपट अनर्थ आणीन.


तर मीही तुमच्या अगदी विरुद्ध जाईन आणि मीच तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


तर मी संतापून तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले.


त्याचे हे भाषण ऐकणार्‍यांच्या अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan