Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 3:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ते कसेही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 पण जर नाही तर महाराज हे आपणास माहित असावे की, आम्ही तुमच्या देवाची उपासना करणार नाही, आणि त्याच्या पुढे आम्ही पालथे पडून त्यास दंडवत करणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 परंतु असे जरी झाले नाही, तरीही महाराज तुम्हाला हे कळावे की आम्ही तुझ्या दैवतांची सेवा करणार नाही किंवा आपण स्थापन केलेल्या या सुवर्ण पुतळ्याला नमनही करणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 3:18
20 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले, मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत.”


तरीपण इस्राएलातील ज्या सात हजारांनी बआलमूर्तींपुढे गुडघे टेकले नाहीत व ज्या प्रत्येकाने मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही, त्यांना मी वाचवीन.”


तो मला ठार मारणार; तरी मी त्याची आस धरीन;1 तरी माझ्या वर्तनक्रमाचे त्याच्यासमोर मी समर्थन करीन.


कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.


तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पण केले; त्यांना त्यांच्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सोडवले आहे; त्याचा धन्यवाद असो!


तुम्ही मूर्तींकडे वळू नये आणि आपल्यासाठी ओतीव देव करू नयेत; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या.


ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरता आपला जीव गमावला तो त्याला राखील.


त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळी म्हणता, ‘उघाड होईल, कारण आभाळ तांबूस आहे.’


परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले की, “देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा;


पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले.


परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हांला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोर्‍यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.”


त्याला त्यांनी कोकर्‍याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले; आणि त्यांच्यावर मरायची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीती केली नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan