Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 महाराज, आपण हुकूम केला की, शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ज्या ज्या मनुष्याच्या कानी पडेल त्याने सुवर्णमूर्तीपुढे साष्टांग दंडवत घालावेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 महाराज तुम्ही असे फर्मान काढले आहे ना, की, जो कोणी शिंग, बासरी, सतार, विणा, पुंगी आणि इतर वाद्याचा आवाज ऐकतो त्याने सुवर्ण् पुतळयास दंडवत करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 महाराज तुम्ही आदेश दिला आहे की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच सर्वांनी सुवर्ण पुतळ्याला दंडवत घालून उपासना करावी,

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 3:10
24 Iomraidhean Croise  

दाविदाने लेव्यांच्या प्रमुखांना आज्ञा केली की सतार, वीणा व झांजा अशी वाद्ये वाजवून आनंदाने उच्च स्वराने गायन करतील असे तुमच्या भाऊबंदांतले गायक नेमा.


ह्या प्रकारे सगळ्या इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश जयजयकार करीत, रणशिंग, कर्णे व झांजा वाजवीत आणि सतारी व वीणा ह्यांचा नाद काढत समारंभाने वर आणला.


दावीद व राजाचा द्रष्टा गाद आणि नाथान संदेष्टा ह्यांच्या आज्ञेप्रमाणे झांजा, सारंग्या व वीणा वाजवण्यासाठी लेव्यांना परमेश्वराच्या मंदिरात उभे केले; ही आज्ञा परमेश्वराने आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे केली होती.


न्याय करण्याच्या मिषाने, उपद्रव योजून अन्याय करणार्‍या न्यायासनाचा तुझ्याशी काही संबंध असेल काय?


“तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करीत असता, प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पाहा, आणि मुलगा असला तर त्याला जिवे मारा; पण मुलगी असली तर तिला जिवंत ठेवा.”


तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा केली की, “जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जिवंत ठेवा.”


शिवाय ह्या भूतलावर न्यायाचे स्थान पाहावे तर तेथे दुष्टता आहे; नीतीचे स्थान पाहावे तर तेथे दुराचार आहे.


जे अन्यायाचे निर्णय करतात व जे लेखक उपद्रवकारक ठराव लिहितात त्यांना धिक्कार असो.


आणि जो कोणी साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकावे;


आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे; नाही घातले तर तुम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल; माझ्या हातांतून तुम्हांला सोडवील असा कोणता देव आहे?”


तेव्हा ते राजाजवळ जाऊन त्याने फिरवलेल्या द्वाहीविषयी त्याला म्हणाले, “महाराज, तीस दिवसपर्यंत जो कोणी आपणाशिवाय कोणा देवाची अथवा मनुष्याची आराधना करील त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे अशी द्वाही आपण फिरवली ना?” राजाने उत्तर दिले की, “मेदी व पारसी ह्यांच्या न पालटणार्‍या कायद्याप्रमाणे हे निश्‍चित ठरवले आहे.”


तुम्ही वीणेच्या सुरावर काहीतरी गात असता; दाविदाप्रमाणे अनेक तंतुवाद्ये बनवता.


मुख्य याजकांनी व परूश्यांनी तर त्याला धरण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की, “तो कोठे आहे हे कोणाला कळल्यास त्याने खबर द्यावी.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan