Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 परंतु तुम्ही मला स्वप्न सांगणार नाही, तर तुमच्यासंबंधाने एकच हुकूम आहे. हा प्रसंग टाळावा म्हणून तुम्ही खोट्यानाट्या गोष्टी सांगायचा बेत केला आहे. माझे स्वप्न मला सांगा म्हणजे त्याचा अर्थ तुम्हांला सांगता येईल किंवा नाही हे मला कळेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 पण जर तुम्ही मला स्वप्न सांगितले नाही तर तुमच्यासाठी एकच शिक्षा आहे. म्हणून माझे मन बदलत नाही तोपर्यंत तुम्ही खोट्या आणि फसव्या गोष्टी सहमत करून मला सांगाव्या असे तुमचे ठरले आहे. म्हणून मला स्वप्न सांगा म्हणजे मला समजेल तुम्ही त्याचा उलगडा करु शकता.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 जर तुम्ही मला माझे स्वप्न सांगणार नाही, तर तुम्हासाठी फक्त एकच शिक्षा आहे. परिस्थिती बदलेल या आशेने तुम्ही मला भ्रामक आणि दुष्ट गोष्टी सांगण्याचा कट रचला आहे. म्हणून तुम्ही मला स्वप्न सांगा आणि मला कळेल की तुम्ही मला त्याचा परिणाम सांगू शकता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 2:9
17 Iomraidhean Croise  

परमेश्वराने विचारले, ‘कसा?’ तो म्हणाला, ‘मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा होईन.’ परमेश्वर म्हणाला, ‘तू त्याला मोह घालशील; जा, तुझ्याकडून हे होईल; तसेच कर.’


इस्राएलाच्या राजाने सुमारे चारशे संदेष्टे जमवून त्यांना विचारले, “मी रामोथ-गिलादावर चढाई करून जाऊ का नको?” त्यांनी उत्तर दिले, “चढाई करून जा; प्रभू ते महाराजांच्या हाती देईल.”


“राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व परगण्यांतील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलावल्यावाचून आतल्या चौकात राजाकडे गेली तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे; मात्र राजा आपला सोन्याचा राजदंड ज्याच्यापुढे करील त्याचाच बचाव होणार; मला तर आज तीस दिवस राजाकडून बोलावणे आले नाही.”


सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल; असत्य बोलणारी जिव्हा केवळ क्षणिक आहे.


पुढे काय होईल ते कळवा म्हणजे तुम्ही देव आहात असे आम्ही समजू; तुम्ही बरेवाईट काहीतरी करा, म्हणजे आम्ही तत्काळ चकित होऊन1 त्याकडे पाहू.


खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञांना वेडे ठरवणारा, ज्ञानी लोकांना मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरवणारा मी आहे.


आणखी हे मानवपुत्रा, आपल्याच मनातील संदेश देणार्‍या तुझ्या लोकांच्या कन्यांकडे तोंड करून त्यांच्याविरुद्ध संदेश दे.


लबाडीस कान देणार्‍या माझ्या लोकांना तुम्ही लबाडी सांगून, जे मरू नयेत त्यांना मारून व जे जगू नयेत त्यांना वाचवून मूठभर जवासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी तुम्ही माझ्या लोकांसमोर माझा अवमान केला आहे.


परमेश्वराने त्यांना पाठवले नसता, ही परमेश्वराची वाणी असे म्हणणारे पोकळ दृष्टान्त व खोटा शकुन पाहतात; आणि शकुनाप्रमाणे खरोखर घडेल अशी आशा धरतात.


मग दानिएलाने राजाकडे जाऊन विनंती केली की, “मला अवकाश द्यावा म्हणजे मी हुजुरास स्वप्नाचा अर्थ सांगेन.”


तोच प्रसंग व समय बदलतो; तो राजांना स्थानापन्न अथवा स्थानभ्रष्ट करितो; तो ज्ञान्यांस ज्ञान देतो व बुद्धिमानांस बुद्धी देतो.


तेव्हा राजाने म्हटले, “मला खातरीने वाटते की तुम्ही वेळ काढत आहात, कारण तुम्हांला ठाऊक आहे की, माझा ठराव होऊन चुकला आहे;


आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे; नाही घातले तर तुम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल; माझ्या हातांतून तुम्हांला सोडवील असा कोणता देव आहे?”


परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी ह्यांना दिले आहे.”


आणि दारयावेश मेदी हा सुमारे बासष्ट वर्षांचा असता राजपदारूढ झाला.


तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनांस जेर करील; तो नेमलेल्या सणांत व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहील; एक काळ, दोन काळ व अर्धा काळपर्यंत ते त्याच्या कबजात राहतील.


पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्त्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan