Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 2:48 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

48 मग राजाने दानिएलास थोर पदास चढवले, त्याला मोठमोठी इनामे दिली, त्याला सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि त्याला बाबेलच्या सर्व ज्ञान्यांच्या प्रमुखांचा अध्यक्ष केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

48 नंतर राजाने दानीएलास मोठा सन्मान आणि अद्भुत भेटवस्तू दिल्या. त्यास अवघ्या बाबेलातील परगण्याची सत्ता दिली आणि दानीएल बाबेलाच्या सर्व ज्ञानी लोकांचा मुख्य प्रशासक झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

48 मग राजाने दानीएलला उच्चपदास चढविले, त्याला अनेक मौल्यवान देणग्या दिल्या. त्याने संपूर्ण बाबेलप्रांतावर त्याला प्रमुख अधिपती नेमले आणि सर्व ज्ञानी लोकांवर प्रमुख अधिकारी म्हणून त्याची नेमणूक केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 2:48
22 Iomraidhean Croise  

बर्जिल्लय फार वयातीत होता; त्याचे वय ऐंशी वर्षांचे होते. राजा महनाईम येथे तळ देऊन राहिला होता तेव्हा बर्जिल्लयाने त्याला अन्नपाणी पुरवले होते; तो फार मोठा मनुष्य होता.


अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता; कारण त्याच्या द्वारे परमेश्वराने अरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता.


सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या व पाचशे गाढवी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता; असा तो पूर्व देशांतल्या सर्व लोकांत थोर होता.


ह्याकरता मी महाजनांकडे जाऊन त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाचे नियम ठाऊक आहेत.” पण त्यांनी तर जोखड साफ मोडले आहे व बंधने तोडून टाकली आहेत.


पण तुम्ही स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगाल तर तुम्हांला माझ्याकडून देणग्या, इनामे व मोठा मान मिळेल; ह्यास्तव स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगा.”


नबुखद्नेस्सर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली, तिची उंची साठ हात व रुदी सहा हात होती; तिची स्थापना त्याने बाबेल परगण्यातील दूरा नामक मैदानात केली.


पण आपण बाबेल परगण्यावर नेमलेले शद्रख, मेशख, अबेद्नगो ह्या नावांचे कोणी यहूदी आहेत त्यांनी, महाराज, आपली पर्वा केली नाही; ते आपल्या देवांची उपासना करीत नाहीत आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करीत नाहीत.”


नंतर राजाने शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना बाबेल परगण्यात मोठ्या हुद्द्यास चढवले.


तेव्हा मी आज्ञा केली की मला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी बाबेलातील सर्व ज्ञानी पुरुषांना माझ्याकडे आणावे.


मी म्हणालो, हे बेल्टशस्सरा, ज्योतिष्यांच्या अध्यक्षा, पवित्र देवांचा आत्मा तुझ्या ठायी आहे व कोणतेही रहस्य तुला समजायला अवघड नाही हे मला ठाऊक आहे, तर मी पाहिलेल्या स्वप्नातील दृष्टान्त व त्यांचा अर्थ मला सांग.


पवित्र देवांचा आत्मा ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे; आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश, विवेक व देवांच्या ज्ञानासारखे ज्ञान ही त्याच्या ठायी दिसून आली; महाराज, आपला बाप नबुखद्नेस्सर राजा ह्यांनी त्याला ज्योतिषी, मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांचा अध्यक्ष नेमले होते;


मी तुझ्याविषयी ऐकले आहे की, तुला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो व कोडी उकलता येतात; आता तुला हा लेख वाचता येऊन त्याचा अर्थ मला सांगता आला तर तुला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, तुझ्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल आणि तू राज्यातील तिघा अधिपतींतला एक होशील.”


तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केल्यावरून त्यांनी दानिएलास जांभळ्या रंगाचा पोशाख लेववला. त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घातला व त्याच्यासंबंधाने सर्वत्र द्वाही फिरवली की हा राज्यातील तिघा अधिपतींतला एक आहे.


राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की, “मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांना घेऊन या.” राजा त्या बाबेलच्या ज्ञान्यांस म्हणाला, “जो कोणी हा लेख वाचील व ह्याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील तिघा अधिपतींतला एक होईल.”


मग मी दानीएल मूर्च्छित झालो व काही दिवस आजारी पडलो; त्यानंतर मी उठून राजाचे कामकाज करू लागलो. हा दृष्टान्त पाहून मी विस्मित झालो; पण तो कोणास कळला नाही.


तेव्हा तू आता येथून पळ आणि आपल्या ठिकाणाकडे जा; ‘तुझा मोठा सन्मान करीन’ असे मी म्हटले होते, पण परमेश्वर तुझ्या सन्मानाला आडवा आला आहे.”


इस्राएल लोक म्हणू लागले, “हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना? तो इस्राएलाची निर्भर्त्सना करायला आला आहे; जो कोणी त्याला ठार मारील त्याला राजा बहुत धन देऊन संपन्न करील, आपली कन्या त्याला देईल, आणि इस्राएलात त्याच्या बापाचे घराणे स्वतंत्र करील.”


तो कंगालांना धुळीतून उठवतो, दरिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात, आणि वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होते; कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यांवर त्याने दुनिया ठेवली आहे.


मावोन येथे एक मनुष्य होता, तो आपला व्यवहार कर्मेल येथे चालवत असे; तो माणूस मोठा मातबर असून त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकर्‍या होत्या; तो कर्मेलात आपल्या मेंढ्यांची लोकर कातरत होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan