Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 2:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 त्या पुतळ्याच्या पावलांच्या बोटांचा काही भाग लोखंडाचा व काही भाग मातीचा होता; तसे ते राज्य अंशत: बळकट व अंशतः भंगुर असे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 जशी पायांची बोटे अंशत: लोखंडाची आणि अंशत: मातीची बनली होती तसे ते राज्य असेल अंशत: बळकट आणि अंशत: ठिसूळ असे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 काही लोखंड व काही माती यांनी बनलेली पावले आणि बोटे आपल्याला दिसली म्हणजेच हे साम्राज्य काही मजबूत व काही दुबळी असतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 2:42
4 Iomraidhean Croise  

आपण त्या पुतळ्याची पावले व पावलांची बोटे पाहिली; त्यांचा काही भाग कुंभाराच्या मातीचा व काही भाग लोखंडाचा होता; तसे हे राज्य द्विविध होईल; तरी मातीत लोखंड मिसळलेले आपण पाहिले तशी त्या राज्यात लोखंडाची मजबुती राहील.


लोखंड मातीबरोबर मिसळलेले आपण पाहिले तसे त्या राज्यातले लोक इतर लोकांबरोबर संबंध जोडतील; पण जसे लोखंड मातीबरोबर एकजीव होत नाही, तसे तेही त्यांच्याबरोबर एकजीव होणार नाहीत.


आता दहा शिंगांविषयी विचारशील तर त्या राज्यातून दहा राजे निघतील व त्यानंतर आणखी एक राजा निघेल; तो त्या पूर्वीच्या राजांहून भिन्न असून तिघा राजांना पादाक्रांत करील.


नंतर मी एक ‘श्वापद समुद्रातून वर येताना’ पाहिले; त्याला ‘दहा शिंगे’ व सात डोकी असून त्याच्या शिंगांवर दहा मुकुट आणि त्याच्या डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan