दानीएल 2:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानतो व तुझे स्तवन करतो की तू मला ज्ञान व बल ही दिली आहेत आणि ज्यासाठी आम्ही तुला विनवले ते तू मला आता कळवले आहेस; तू आम्हांला राजाची गोष्ट कळवली आहेस.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 माझ्या पूर्वजाच्या देवा, मी तुझे आभार मानतो आणि तुझे स्तवन करतो, कारण तू मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले; आणि जे आम्ही तुझ्याजवळ मागितले ते सर्व तू आता मला कळवले आहे म्हणून मी तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करतो, कारण तू राजाची गोष्ट आम्हास कळविली आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 हे आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा, मी तुम्हाला धन्यवाद देतो व तुमची स्तुती करतो: तुम्हीच मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले, मी तुम्हाला जे काही मागितले, ते मला ज्ञात करून दिले, तुम्ही आम्हाला राजाचे स्वप्न ज्ञात करून दिले.” Faic an caibideil |