Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा राजाने हुकूम केला की, ‘माझी स्वप्ने काय आहेत ते सांगायला ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार व खास्दी ह्यांना बोलावून आणा.’ मग ते सर्व राजासमोर हजर झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा राजाने फर्मान काढला की, जादूगार आणि ज्योतिषी जाणणारे तसेच मांत्रिक आणि ज्ञानी लोक ह्यांनी यावे आणि राजाला ते स्वप्न सांगावे, म्हणून ते राजासमोर हजर झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 म्हणून राजाने आदेश दिला की जादूगार, मांत्रिक, तांत्रिक आणि ज्योतिषी यांना बोलवावे आणि त्याला जे स्वप्न पडले ते सांगावे, जेव्हा ते आत आले आणि राजासमोर उभे राहिले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 2:2
16 Iomraidhean Croise  

सकाळी फारोचे चित्त अस्वस्थ झाले, आणि त्याने मिसर देशातील अवघे ज्योतिषी व पंडित ह्यांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली, पण फारोला त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता.


मग राजाने काळ जाणणार्‍या पंडितांना विचारले; (तो राजा सर्व न्यायशास्त्री व कायदेतज्ज्ञ ह्यांचा असा सल्ला घेत असे;


मग फारोनेही जाणते व मांत्रिक बोलावले; मिसराच्या त्या जादुगारांनीसुद्धा आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला.


मिसराच्या अंगची हिंमत खचेल; त्याची मसलत मी व्यर्थ करीन; ते मूर्तींना, मांत्रिकांना, भूतवैद्यांना व गारुड्यांना प्रश्‍न विचारतील.


ते तुम्हांला म्हणतील, “भूतवैद्यांना व छांछू करणार्‍या मांत्रिकांना विचारायला जा;” तेव्हा म्हणा, लोकांनी आपल्या देवाला विचारू नये काय? जिवंतांसाठी मेलेल्यांना विचारावे काय?


ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतींत राजा त्यांना जे काही विचारी त्यांत ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिष्यांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा दसपट हुशार आहेत असे त्याला दिसून येई.


अव्यंग, सुरूप, सर्व व्यवहारांत दक्ष, ज्ञानसंपन्न, विद्यापारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यांना खास्द्यांची विद्या व भाषा शिकवावी.


खास्द्यांनी राजास उत्तर केले, “महाराजांची ही गोष्ट सांगेल असा कोणी मनुष्य सार्‍या दुनियेत नाही; असली गोष्ट ज्योतिष्यांना, मांत्रिकांना किंवा खास्द्यांना कोणाही थोर व पराक्रमी राजाने आजपर्यंत विचारली नाही.


दानिएलाने राजाला उत्तर दिले की, “महाराजांनी जे रहस्य विचारले आहे ते ज्ञानी, मांत्रिक, ज्योतिषी व दैवज्ञ ह्यांना महाराजांना सांगता येणार नाही;


ह्यावर कित्येक खास्द्यांनी राजाकडे जाऊन यहूद्यांवर दोषारोप केला.


त्याची चिन्हे किती थोर! त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा! त्याचे राज्य सर्वकालचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे.


तेव्हा मी आज्ञा केली की मला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी बाबेलातील सर्व ज्ञानी पुरुषांना माझ्याकडे आणावे.


राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की, “मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांना घेऊन या.” राजा त्या बाबेलच्या ज्ञान्यांस म्हणाला, “जो कोणी हा लेख वाचील व ह्याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील तिघा अधिपतींतला एक होईल.”


नंतर पलिष्ट्यांनी याजकांना व शकुन पाहणार्‍यांना बोलावून विचारले, “परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे? त्याच्याबरोबर काय देऊन तो स्वस्थानी पाठवावा?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan